Pune Crime News | कात्रज परिसरातील चामुंडामाता मंदिरातील दागिने चोरणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, 2 लाख 60 हजाराचा ऐवज जप्त (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कात्रज घाटातील (Katraj Ghat) वळणाजवळील चामुंडाभवानी माता मंदिरामधील (Chamundabhavani Mata temple) दागिने चोरून नेणार्‍यास भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police) अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 60 हजार रूपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आरोपीविरूध्द 50 हून अधिक गंभीर गुन्हयांची नोंद असून तो डबल मर्डरच्या (Double Murder) गुन्हयात सन 2018 पासून जेलमध्ये होता. मार्च 2023 मध्ये तो जामिनावर बाहेर आला आणि त्याने ऑगस्ट 2023 मध्ये मंदिरातील दागिन्यांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News)

सुनिल आण्णा कांबळे (36, रा. रामनगर, बापुजी बुवा चौक, पिठाच्या गिरणीजवळ, वारजे) असे अटक केलेल्याची नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी 23 ऑगस्ट 2023 रोजी चामुंडाभवानी माता मंदिरातील दागिन्यांची चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश करून देवीला झोपून साष्टांग दंडवत घालून चोरी केल्याचे उघडकीस आले होते. आरोपीबाबत पोलिस अंमलदार महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांना माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने साथीदाराच्या मदतीने सदरील चोरी केल्याचे कबुल केले. (Pune Crime News)

आरोपीवर 50 हून अधिक गुन्हयांची नोंद आहे. तो दुहरी खून प्रकरणी सन 2018 पासून जेलमध्ये होता. मार्च 2023 मध्ये जो जामिनावर बाहेर आला आहे. त्यानंतर त्याने मंदिरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गिरीश दिघावकर,
सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पीएसआय धीरज गुप्ता, अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाळे, अशिष गायकवाड, राहुल तांबे, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, मितेश चोरमले, अभि चौधरी, अभि जाधव, विक्रम सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पुणे पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अवघ्या 10 महिन्यात 50 जणांवर MPDA

Pune Crime News | मित्राच्या जामिनासाठी ठाण्यातून अट्टल सोनसाखळी चोरांना बोलावलं !
मुख्य सुत्रधारास अटक करून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश