Pune Crime News | कर्ज थकीत असताना बँकेचे बनावट लेटरहेड तयार करुन दुसऱ्या बँकेतून 60 लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न; गहाण मालमत्तेचा परस्पर केला विकसन करारनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News |जनसेवा बँकेतून ४० कोटी रुपयांचे कर्ज (Bank Loan) घेतले. त्यासाठी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा परस्पर विकसन करारनामा तयार केला. बँकेचे बनावट लेटरहेडचा वापर करुन दुसर्‍या बँकेतून ६० लाख रुपयांचे वाहन कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत जनसेवा बँकेचे (Janseva Bank) व्यवस्थापक राजेंद्र सुपेकर यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दशरथ विठ्ठल शितोळे Dashrath Vitthal Shitole (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ शितोळे याने जनसेवा बँकेच्या ससाणेनगर शाखेतून (Janseva Bank Sasanenagar Branch) विविध फर्मवर ४० कोटी रुपयांचे कर्ज २०१८ मध्ये घेतले होते. त्यासाठी त्याने स्वत:च्या मालकीची स्थावर मालमत्ता गहाण ठेवली होती. बँकेकडे मिळकत गहाण ठेवल्यानंतर बँकेच्या परवानगीशिवाय कर्जदाराला तारण मिळकतीमध्ये तिसर्‍या व्यक्तीचा हक्क निर्माण करता येत नाही. तसेच फेरबदल करता येत नाही. असे असताना त्यांच्या शितोळे टिश्यू कल्चर (Tissue Culture) वर १० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असताना कदम वाक येथील एन ए जमीन तारण ठेवली होती. बँकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांनी त्यावर अन्य दोघांशी विकसन करारनामा केला. त्यांच्याकडून १५ लाख रुपये स्वीकारले. त्याजागेवर अर्धवट बांधकाम करुन बँकेची फसवणूक (Fraud Case) केली.

त्यानंतर दशरथ शितोळे याने जनसेवा बँकेचे १५ डिसेबर २०२२ व २७ डिसेबर २०२२ अशा दोन तारखांचे बनावट लेटरहेड (Fake Letterhead) तयार करुन त्यावर दशरथ विठ्ठल शितोळे यांना जनसेवा सहकारी बँकेकडून (Janaseva Sahakari Bank) विविध कर्जसुविधा देण्यात आलेल्या आहेत. सदरची कर्जखाती एन पी ए झाली असे सिबीलला कळविले आहे. जे तांत्रिक कारणामुळे आहे. सीसीचे नुतनीकरण झाले नसून ते नुतनीकरण करण्याची प्रक्रिया चालू आहे. यासाठी मुदतवाढ घेतली आहे. तसेच सर्व खाती नियमित आहेत व व्याज नियमित भरले जात आहे, असा मजकूर बनावट लेटरहेडवर लिहिला. त्यावर बँक मॅनेजरची बनावट सही करुन बँकेचा बनावट शिक्के त्याने उमटविले. त्यामुळे बँकेच्या लौकिक व प्रतिष्ठेला धक्का बसला असून बँकेची फसवणूक (Cheating Case) झालेली आहे. या बनावट लेटरहेडचा वापर करुन अ‍ॅक्सीस बँकेच्या सेनापती बापट रोडवरील (Axis Bank Senapati Bapat Road) कर्ज विभागात ६० लाख रुपयाचें वाहन कर्ज मिळविण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळाल्यावर बँकेच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंदलकर तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Janseva Bank Chaturshringi Police Registered Case Against Dashrath Vitthal Shitole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा