Pune Crime News | घोरपडी पेठ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला खडक पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील घोरपडे पेठेत 30 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घरात शिरून अनिल रामदेव साहू Anil Ramdev Sahu (वय-35) याचा गोळी झाडून खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला खडक पोलिसांनी (PunePolice) अटक केली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराकडून पोलिसांनी 3 पिस्टल आणि 2 काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई खेड शिवापूर येथे कली आहे. (Pune Crime News)

नवनाथ उर्फ नब्या सुरेश लोधा Navnath alias Nabya Suresh Lodha (वय-37 रा. घोरपडी पेठ, कृष्णा हाईट्स, पुणे) असे खडक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रोहित संपत कोमकर (वय-33 रा. गुरुवार पेठ, पुणे), गणेश उल्हासराव शिंदे (वय-41 रा. धनकवडी, पुणे) आणि अमन दिपक परदेशी (वय-29 रा. घोरपडे पेठ, पुणे) यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत मयत व्यक्तीचा भाऊ घुरणकुमार हरिदेव साहु (वय-24 रा. श्रीमंत सुवर्णभारत मित्र मंडळाजवळ, घोरपडी पेठ पुणे मुळ रा. वाजीतपुर, जि. दरभंगा, बिहार) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास फिर्यादी हे गाढ झोपेत असताना अचानक दरवाजा वाजला. फिर्यादी घुरनकुमार जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता समोर दाढीमिशा असलेला, अंगाने जाड अनोळखी व्यक्ती उभा होता. अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना ‘तेरा भाई किधर है, उसको बुला’ असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी किचनमध्ये हडफोन लावून बसलेल्या अनिल साहू यांना बाहेर आलेल्या व्यक्तीविषयी सांगितले. अनिल साहू बाहेर गेले आणि त्या व्यक्तीसोबत बोलत होते. बोलत असताना त्या व्यक्तीने अनिल यांना काहीतरी विचालं. त्यावर अनिल यांनी मान हलवून नकार दिला. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने कपाळावर बंदूक लावून गोळी झाडली आणि त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी इमारतीच्या बाहेर थांबलेल्या एका दुचाकीवर अज्ञात साथीदारासह दुचाकीवरुन पळून गेला. (Pune Crime News)

गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या सुरेश लोधा हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता. त्याचा शोध खडक पोलीस ठाण्यातील तपास पथक घेत होते. दरम्यान, पोलीस अंमलदार हर्षल दुडम व आशिष चव्हाण यांना माहिती मिळाली की, घोरपडी पेठेत गोळी झाडून खून करणारा मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नब्या लोधा खेड शिवापूर येथे असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने खेड शिवापूर येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक गावठी पिस्टल जप्त केली. तसेच त्याचा साथीदार गणेश उल्हासराव शिंदे याच्याकडून दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

नवनाथ उर्फ नब्या लोधा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील खडक, मुंढवा व दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) दुखापत, घातक शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, पिस्टलचा वापर करुन खूनाचा प्रयत्न करणे, जाळपोळ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संपत राऊत करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील (IPS Pravin Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदिपसिंह गील (IPS Sandeep Singh Gill), फरासखाना विभागाचे
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने (Sr PI Sunil Mane), पोलीस निरीक्षक गुन्हे संपत राऊत (PI Sampat Raut),
सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव (API Rakesh Jadhav), पोलीस उपनिरीक्षक अजीज बेग (PSI Aziz Baig),
पोलीस अंमलदार हर्षल दुडम, संदीप तळेकर, सागर घाडगे, लखन ढावरे, आशीष चव्हाण, मंगेश गायकवाड, सागर कुडले,
अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, रफिक नदाफ, महिला पोलीस अंमलदार राणी जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MSRTC Bus Strike | दिवाळीत लालपरी सुसाट धावणार! संप न करण्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय

Pune Pimpri Crime News | घरात घुसून तरुणाला कोयत्याने मारहाण, बोपखेल मधील घटना; 6 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे : सुनेसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्यावर FIR