Pune Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला कोंढवा पोलिसांकडून अटक, दोन पिस्टल, 4 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कंबरेला दोन गावठी पिस्टल (Pistol) लावून फिरणाऱ्या एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याच्याकडून 55 हजार 400 रुपयांचे दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई श्रीराम चौक ते इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर केली. तुळशीराम शहाजी उगडे Tulshiram Shahaji Ugde (वय-25 रा. टिळेकरनगर, पुणे, मुळ रा. लांडवाडी, ता. कर्जत जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की, खडी मशीन पोलीस चौकी जवळील श्रीराम चौक ते इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एक तरुण संशयित रित्या थांबला आहे. त्याच्या कंबरेला पिस्तुलासारखे हत्यार लावल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपास पथकाने घटनास्थळी जाऊन सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी कंबरेला एक पिस्टल व एक गावठी कट्टा खोचलेला दिसला. तसेच जिन्स पॅन्टच्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशीत दोन जिवंत काडतुसे, पिस्टलच्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी आरोपीकडून 55 हजार 400 रुपयांचे दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील (API Dinesh Patil) करीत आहेत. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे (ACP Shahuraje Salve), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr. PI Santosh Sonwane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले (PI Sandeep Bhosale)

यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील (API Dinesh Patil),
सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे (API Lekhji Shinde), पोलीस अंमलदार विशाल मेमाणे,
सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, जोतिबा पवार, लक्ष्मण होळकर,
संतोष बनसुडे, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात बँक खातं रिकामं, पुण्यातील युवकाने गमावले साडे 15 लाख