Pune Crime News | कोंढवा : बनावट नाव धारण करुन लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; 26 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | बनावट नाव सांगून त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात (Import Export Business) तोटा झाल्याचे सांगून २६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढायला सांगून फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०११/२३) दिली आहे. त्यानुसार अमित चव्हाण (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विवाहासाठी एक वेबसाईटवर प्रोफाईल तयार केली होती.
त्यावर स्वत:चे नाव लपवून रोहित राजाराम देशमुख असे नाव अमित चव्हाण याने सांगितले.
फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फिर्यादीशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले.
त्याचे व्हिडिओ काढले. आपला इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय असून त्यामध्ये तोटा झाला असे सांगून फिर्यादी यांना
कर्ज काढायला लावले. कर्ज काढलेले २६ लाख ६० हजार रुपये घेतले. त्यांनी कर्जाचा हप्ता भरायला सांगितल्यावर त्याने नकार देऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी चौकशी केली तेव्हा त्याने आपले खरे नाव लपवून ठेवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonwane) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

4 October Rashifal | सिंह, कन्या आणि तुळसह या २ राशीवाल्यांना चांगल्या लाभाचे संकेत, वाचा दैनिक भविष्य