
Pune Crime News | उत्तमनगर परिसरात दहशत निर्माण करणार्या शिर्या वाघमारेसह 5 जणांविरूध्द मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 30 टोळयांवर कारवाई
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | उत्तमनगर परिसरात (Uttam Nagar Police Station) स्वतःची टोळी निर्माण करून दहशत निर्माण करणार्या शिर्या वाघमारेसह 5 जणांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई केली आहे. मोक्का कारवाई करण्यात आलेल्या 5 जणांविरूध्द उत्तमनगर पोलिस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)
श्री उर्फ शिर्या गणेश वाघमारे Shree Alias Shirya Ganesh Waghmare (22, रा. राहुलनगर, शिवणे), प्रतिक संजय नलावडे Pratik Sanjay Nalawade (24, रा. फ्लॅट नं. 13, दुसरा मजला, गंगा बिल्डींग, कोंढवे-धावडे, पुणे) यांच्यासह 3 अल्पवयीन युवकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. शिर्या वाघमारे आणि प्रतिक नलावडे यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत म्हणजे येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेवुन रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे. (Pune Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 22 मे 2023 रोजी शिर्या वाघमारे आणि त्याचे इतर साथीदार 3 वेगवेगळया मोटारसायकलवरून फिर्यादीच्या घराजवळ गेले. तेथे त्यांनी या परिसरातील पोरांनी आमच्या मित्राला मारले आहे, आज याला मारून टाकणार असे बोलुन लोखंडी हत्याराने फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी शिर्या वाघमारे आणि त्याच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल केला. (MCOCA News)
शिर्या वाघमारे याने परिसरात स्वतःची संघटित टोळी तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याने टोळीतील वेगवेगळे साथीदार सोबत घेवुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे स्वतःच्या फायद्याकरिता केले. तो आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व वाढवत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तरी देखील ते धजावले नाहीत. त्यामुळे उत्तमनगर पोलिस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सध्याचे वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे (Warje Malwadi Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Sr PI Sunil Pandurang Jaitapurkar) यांनी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्याकडे आरोपींवर मोक्का कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव सादर केला.
प्राप्त प्रस्तावाची छाननी झत्तल्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शिर्या वाघमारे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्तांनी पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासुन आतापर्यंत तब्बल 30 संघटित टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेश शर्मा, कोथरूड विभागाचे तत्कालीन
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, विद्यमान वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर
(Sr PI Kiran Balasaheb Balwadkar) , पोलिस निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख (PI Shabnam Shaikh),
सहाय्यक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे
(API Umesh Rokde), पोलिस अंमलदार नांगरे, हजारे, पवार, गायकवाड, पाडाळे आणि तोडकर यांच्या पथकाने
ही कारवाई केली आहे.
Web Title : Pune Crime News | MCOCA against 5 people including Shirya Waghmare who created terror in Uttamnagar area; Police Commissioner Ritesh Kumar has taken action against 30 gangs so far
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Water Crisis Deepens in Mohammadwadi and Undri as Newly Constructed Tanks Remain Devoid of Water
- Tragic Incident in Daund: Doctor Takes His Own Life After Killing Wife and Two Children
- Violent Inmate Altercation Shakes Yerwada Central Jail, Prompting Concerns Over Prison Safety
- ILS Law College Pune to Introduce New AI and ML Courses: Bridging Law and Technology
- City Café Owner Arrested for Alleged Cruelty against Wife: A Disturbing Case of Domestic Abuse