Pune Crime News | कोंढवा परिसरात दहशत निर्माण करणार्‍या मंगेश माने व त्याच्या 4 साथीदारांविरूध्द मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा परिसरातील साईनगर गल्ली नं. 2 मध्ये दहशत निर्माण करणार्‍या मंगेश माने आणि त्याच्या 4 साथीदारांविरूघ्द पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत पुण्यातील 29 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime News)

मंगेश अनिल माने Mangesh Anil Mane (26, रा. सरगम चाळ, गल्ली क्रमांक 1, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), पवन रविंद्र राठोड Pawan Ravindra Rathod (23, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे), सागर कृष्णा जाधव Sagar Krishna Jadhav (30, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे व सरगम चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे), अभिजीत उर्फ जब्या सुरेश दुधनीकर Abhijeet alias Jabya Suresh Dudhanikar (21, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) आणि सुरज पाटील (Suraj Patil) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नाव आहेत. आरोपी पवन राठोड आणि अभिजीत उर्फ जब्या दुधनीकर यांना अटक करण्यात आलेली असून सध्या ते येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहेत. टोळी प्रमुख मंगेश माने, सुरेश पाटील आणि सागर जाधव हे अद्याप फरार आहेत. (Pune Crime News)

आरोपींनी दि. 27 मार्च 2023 रोजी साईनगर गल्ली नं. 2 मध्ये एकास कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल आहे. आरोपी मंगेश माने याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून जबरी चोरी, खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहेत.

कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) यांनी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjankumar Sharma) यांच्याकडे माने टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणुन प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करून माने टोळीवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 29 संघटित गुन्हेगारी टोळयांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogale), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले (PI Sandeep Bhosale), सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भाबड (API Vishwas Bhabad), सर्व्हेलन्स पथकातील अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण आणि हणमंत रूपनवर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :   Pune Crime News | MCOCA against Mangesh Mane and his 4 accomplices who created terror in Kondhwa area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा