Pune Crime News | अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍यास ‘ढोंगी बुवा’ अन् महिलेनं संपवलं; पुण्याच्या कात्रज घाटात फेकला मृतदेह

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍यास ढोंगी बाबानं महिला अन् साथीदारांच्या मतदीनं संपवल्याचा धक्कादायक प्रकार भारती विद्यापीठ पोलिसांच्या (bharti vidyapeeth police station) तपासात उघडकीस आला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज नवीन बोगद्याजवळील (katraj new tunnel) हॉटेल मराठेशाही (Hotel Maratheshai) जवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. प्रकरणाच्या तपासाअंतील भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या (bharti vidyapeeth police) तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. pune crime news murder of husband due to immoral relationship wife and other three arrested by bharti vidyapeeth police in pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

आनंद गुलाब गुजर (43, रा. प्रगती दर्शन, राजे शिवाजीनगर, स्पाईन रोड, चिखली, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
यासंदर्भात आनंद यांचा भाऊ सुनिल गुलाब गुजर (36, रा. मु.पो. भोसरे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी रमेश विलास कुंभार (49, रा. कुंभार निवास, गुरूदेवनगर, आकुर्डी, पुणे), सरोज आनंद गुजर (40, रा. चिखली, पुणे), यश योगेश निकम (19, रा. वाल्हेकरवाडी, निगडी, पुणे)
आणि अमोल रामदास बडदम (रा. वाल्हेकरवाडी, निगडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांना कात्रज नवीन बोगद्याजवळील (katraj new tunnel) हॉटेल मराठेशाही जवळ त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
त्यांनी त्याबाबत माहिती काढण्यास सुरूवात केली.
दरम्यान, आनंद यांचा भाऊ सुनिल यांनी पोलिसांना आनंदची पत्नी सराजे आणि बुवा बाजी करणारा रमेश कुंभार यांच्यात प्रेमसंबंध म्हणजेच अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीवरून देखील वाद सुरू असल्याचे सांगितले.
पोलिसांनी सखोल तपास करण्यास सुरूवात केली.

आनंद गुजरची पत्नी सरोजचे बुवा बाजी करणार्‍या रमेश कुंभार याच्याशी झेंगाट असल्याची माहिती तपासात समोर आली.
अखेर सरोज आणि रमेश कुंभार यांनी त्यांचे प्रेमसंबंध म्हणजेच अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले.
त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी साथीदाराच्या मदतीने आनंद गुजर यांचा खून (Murder) केल्याची कबुली दिली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police) ही कामगिरी अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे (additional commissioner of police dr. sanjay shinde),
उपायुक्त सागर पाटील (deputy commissioner of police sagar patil),
सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण (assistant commissioner of police sushma chavan),
वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Inspector Jagannath Kalaskar) ,
पोलिस निरीक्षक संगिता यादव (Police Inspector Sangita Yadhav),
पोेलिस निरीक्षक प्रकाश पासलकर (Police Inspector Prakash Pasalkar) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे (Police Sub Inspector Nitin Shinde),
अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, विक्रम सावंत,
आशिष गायकवाड, सचिन गाडे, जगदीश खेडकर, प्रसाद टापरे आणि संतोष खताळ यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : pune crime news murder of husband due to immoral relationship wife and other three arrested by bharti vidyapeeth police in pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

Pune News | ठाकरे सरकारसाठी नामुष्की ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नाही, तणावातून स्वप्नील लोणकरची आत्महत्या; जाणून घ्या