Pune Crime News | पुणे : ब्लॅकमेल करुन 13 लाख उकळले, दाम्पत्याच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्हॉट्सपवर पाठवलेल्या मेसेजची पोलिसांत तक्रार करणार असल्याची वारंवार धमकी देऊन एका व्यक्तीकडून 13 लाख रुपये उकळले. त्यानंतर दाम्पत्याने वारंवार धमकी देऊन पैशाची मागणी केली. दाम्पत्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून 38 वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली (Suicide Case). याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 13 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत नारायण पेठेत घडला.(Pune Crime News)

अशोक जोशी (वय-38 रा. मल्हारगड, नऱ्हे, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अशोक यांचे भाऊ गोपाल कंजीभाई जोशी (वय-33 रा. मल्हारगड, नऱ्हे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन वैष्णवी गणेश चव्हाण (वय-26) आणि गणेश चव्हाण (वय-28 रा. खैरेवाडी, विद्यापीठ रोड, पुणे) यांच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा भाऊ अशोक याने वैष्णवी चव्हाण हिच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला होता. याची तक्रार पोलिसांकडे करणार असल्याची धमकी आरोपींनी दिली. आरोपींनी अशोक यांना वारंवार धमकी दिली. तसेच गणेश चव्हाण याने अशोक याच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करुन जबरदस्तीने 13 लाख रुपये घेतले. यानंतर वैष्णवी व गणेश यांनी पुन्हा पैशांची मागणी केली.

आरोपी गणेश याने फिर्यादी यांचा भाऊ कामाला असलेल्या ठिकाण जाऊन पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकी
देऊन त्याला ब्लॅकमेल केले. आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या भावाने नारायण पेठेत काम
करत असलेल्या ठिकाणी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.
पोलिसांनी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Saurabh Rao | सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्त पदी नियुक्ती

Pune News | ईस्पोर्ट्स आणि गेम डेव्हलपमेंट क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण होण्याची आशा – सीआयआयच्या अध्यक्षांचे मत