Pune Crime News | पुणे : लष्कराच्या रुग्णालयासाठी उपकरणे पाहिजेत, ज्येष्ठ नागरीकाची आर्थिक फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भारतीय लष्करात (Indian Army) कार्यरत असल्याची बतावणी करुन लष्कराच्या रुग्णालयात (Army Hospital) काही उपकरणे पाहिजे आहेत, अशी बतावणी करुन एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख 93 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर 23 ते आजतागायत घडला आहे.(Pune Crime News)

याबाबत गोविंद चंद्रकांत बहिरट (वय-57 रा बिबवेवाडी, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारकावर फसवणुक व आयटी अॅक्ट नुसार (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्य़ादी यांना फोन करुन भारतीय लष्करातून बोलत असल्याचे सांगितले. भारतीय लष्कराच्या रुग्णालयासाठी उपकरण खरेदीसाठी खोट्या ऑर्डर व त्याची कागदपत्रे पाठवून त्याद्वारे आणि दमदाटी करुन तीन लाख 83 हजार रुपये ऑनलाईन घेऊन फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने (PI Sharad Zine) करीत आहेत.

स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

पुणे : लोहगाव (Lohegaon) परिसरात राहणाऱ्या संतोष बजरंग नलावडे (वय-42) यांना अनोळखी व्यक्तीने फोन करुन स्टॉक ट्रेडिंग मध्ये पाच ते दहा टक्के नफा मिळवून देऊ शकतो, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या बँकेची माहिती घेऊन त्यावरुन चार लाख 45 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेत फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार (PI Sarjerao Kumbhar) करीत आहेत.

अशाच प्रकारे घोरपडी येथील देवेन इजिडियस सिक्वेरा (वय 51) यांनी इन्स्टाग्रामवर आलेली जाहिरात पाहिली असता,
त्यात स्टॉक तसेच आयपीओ मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन विवध व्हॉट्सअॅप,
लिंक व बँकेचे वापरकर्ते धारक यांच्या खात्यावर चाल लाख रुपये घेऊन कोणताही परतावा न देता फसवणूक केली.
पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prithviraj Chavan – Maharashtra Assembly Elections | नाना पटोलेंच्या अनुपस्थितीत पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा; म्हणाले – “आगामी विधानसभा निवडणूका…”

Dapodi Pune Crime News | पिंपरी : अतिक्रमण कारवाईला विरोध करुन महिला सुरक्षा रक्षकांचा विनयभंग

Manoj Jarange Patil-Maratha Reservation Andolan | मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटींचा आकडा, जरांगे म्हणाले – “नावाचा वापर करून पैसे लुटण्याचे काम…”