Pune Crime News | पुणे : रस्त्यालगत लघुशंका केल्याच्या कारणावरुन वार, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याच्या कारणावरुन दोन जणांनी एका व्यक्तीवर धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खडकी भाजी मंडईच्या पाठीमागे घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police) दोन जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत आदम मुजफुर उर्फ सलीम खान (वय-39 रा. इंदिरा नगर, दर्गा वसहात, खडकी बाजार) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साहिल सलीम शेख (रा. खडकी बाजार) व अनुज दिनेश गुप्ता (रा. हडपसर) याच्यावर आयपीसी 325, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलीम खान हे खडकी कॅन्टोन्मेंट चाळीच्या दिशेने चालत जात होते.
खडकी भाजी मंडई मागील रोडलगत त्यांनी लघुशंका केली. यावरुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी
करत धक्काबुक्की केली. आरोपी साहिल याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यात दोन ठिकाणी व हाताच्या कोपऱ्यावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या मारहाणीत फिर्यादी यांच्या हाताचा कोपरा फ्रॅक्चर झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेत वस्ताऱ्याने गळ्यावर वार करुन खून : फरासखाना पोलिसांकडून आरोपीला अटक

Pune Crime Court News | पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

Nikhil Wagle On Pune Police | कालचा हल्ला पुणे पोलिसांच्या संगनमताने, पत्रकार निखिल वागळे यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आजपासून बेमुदत उपोषण, मराठा बांधवांना केले आवाहन, ”सर्व आमदारांना फोन करा…”

Accident On Samriddhi Highway | समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; 3 ठार, 2 जखमी

Pune Bharti Vidyapeeth Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक