Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 4 थी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अजिंक्य काळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही चौथी कारवाई आहे.

अजिंक्य संतोष काळे Ajinkya Santosh Kale (वय-21 रा. गणेशनगर, आंबेगाव पठार, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत पिस्टल (Pistol), कोयता, चाकू या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime News)

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Srihari Bahirat) व
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumhar) यांनी वरिष्ठांच्या
मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात
(Nashik Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे
(P.C.B. Crime Branch Senior Police Inspector Surekha Waghmare) यांनी केली

Web Title :- Pune Crime News | Pune’s staunch criminal lodged in Nashik Jail, CP Ritesh Kumar’s 4th action under MPDA Act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल