Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी चोरल्या दुचाकी, अट्टल गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात; 13 गुन्हे उघड (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Faraskhana Pune Police News | फक्त मौजमजा करण्यासाठी पुणे शहरात दुचाकी चोरणाऱ्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे (Arrest In Vehicle Theft). त्याच्याकडून 13 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई नेहरु चौक, भाजी मार्केट येथे करण्यात आली. खंडु दिलीप चौधरी (वय-23 रा. मु.पो. निटुर, साधनाथ मंदिराशेजारी, ता. निलंगा, जि. लातुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. यापार्श्वभूमीवर तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर, समिर माळवदकर, संदीप कांबळे हे वाहन चोरीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासत होते. सीसीटीव्ही फुटेज मध्ये वाहन चोरी करताना मिळता जुळता व्यक्ती भाजी मार्केट येथे आल्याची माहिती पोलीस अंमलदार समीर माळवदकर यांना मिळाली.(Pune Crime News)

पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने फरासखाना पोलीस ठाण्याच्या
हद्दीतील रविवार पेठ, नेहरू चौक, भाजी मार्केट, मंडई परिसरातुन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या
दुचाकी मुळगावी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी 13 दुचाकी जप्त करुन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपीने फरासखाना -7, कोथरुड -2, चतु:श्रृंगी 1, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील 3 असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग
प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक गुन्हे अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड,
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, समिर माळवदकर, राकेश क्षीरसागर,
प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, मेहबुब मोकाशी, प्रमोद मोहिते, गणेश आटोळे, शशीकांत ननावरे,
तुषार खडके, अजित शिंदे यांच्य पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar In Baramati Lok Sabha | खास शैलीत मतदारांना पटवण्याचा अजितदादांचा प्रयत्न, ”मी पुण्याच्या सभेत मोदी-शहांशी विकासाच्या गप्पा मारत होतो, त्यांना निधी पाहिजे सांगितले”

Uttam Jankar On Ajit Pawar | उत्तम जानकारांची अजित पवारांवर खोचक टीका, ७७ हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्यांना चुना लावून बगळा केलं