Pune Crime News | कायद्याचे रक्षकच बनले भक्षक! भांडण मिटवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडून पैशाची मागणी, रेस्टॉरंट चालकाचा व्हिडीओ व्हायरल (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चुकीची ऑर्डर दिल्याच्या रागातून हॉटेल स्टाफला मारहाण करण्यात आली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, भांडण मिटवण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्याकडे पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ परिसरात रेस्टॉरंट चालवणाऱ्या विक्रांत सिंग यांनी एक व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर पोस्ट करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली आहे. यामध्ये कायद्याचे रक्षक असलेले पोलिसच जर भक्षक बनू पाहत असतील तर शहरातील व्यापाऱ्यांची सुरक्षा कोणाच्या भरवशावर आहे असा सवाल त्यांनी केला.(Pune Crime News)

दोन दिवसांपूर्वी रात्री अकरा-साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विक्रांत सिंग यांनी नेहमीप्रमाणे रेस्टॉरंट बंद केले. त्यानंतर सर्वजण झोपायच्या तयारीत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास 8 ते 10 जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी चुकीची ऑर्डर दिल्याच्या कारमाणावरुन हॉटेल मधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. टोळक्याच्या तावडीतून वाचण्यासाठी कर्मचारी पळून जाऊ लागला. त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करुन रस्त्यावर बेदम मारहाण केली. त्याच्यावर दगडफेक देखील केल्याचा आरोप विक्रांत सिंग यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

या घटनेबाबत भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडेच पैशांची मागणी केल्याचा आरोप
विक्रांत सिंग यांनी केला आहे. कायद्याचे रक्षक असलेले पोलिसच जर भक्षक बनू पाहत असतील तर शहरातील
व्यापाऱ्यांची सुरक्षा कोणाच्या भरवशावर आहे, असा सवाल विक्रम सिंग यांनी केला आहे.

केवळ राजकीय नेत्यांची सुरक्षा करण्यात मग्न असलेल्या पोलिसांकडे व्यावसायिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला पाहिजे,
असे विक्रम सिंग यांन व्हिडीओ म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी
आता या प्रकरणात कारवाई करणार का? कारवाई केली तर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Builder Vishal Agrwal Arrest | पुणे न्यायालयाच्या बाहेर गोंधळ! विशाल अग्रवालवर शाई फेकली; 5 ते 8 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात (Video)

Porsche Car Accident In Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन धनिकपुत्राने पबमध्ये 90 मिनिटात उडवले 48 हजार, पोलीस आयुक्तांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Builder Vishal Agrwal Arrest | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघातानंतर बिल्डर विशाल अग्रवालने पोलिसांना दिला होता असा गुंगारा

Devendra Fadnavis On Rahul Gandhi | पुण्याच्या घटनेचं राजकीयकरण केलं हे निषेधार्य, पोलिसांनी योग्य कारवाई केली – देवेंद्र फडणवीस