Pune Crime News | हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा चोरटा वारजे माळवाडी पोलिसांकडून गजाआड; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीकडून 12 लॅपटॉप, सोनी कंपनीचा कॅमेरा, 2 दुचाकी जप्त; 8 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कॉलेज परिसरातील बिल्डिंग, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे चार्जिंग लावलेले लॅपटॉप (Laptop) चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या वारजे माळवाडी पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 12 लॅपटॉप, 7 लॅपटॉप चार्जर, 1 सोनी कंपनीचा कॅमेरा, 2 दुचाकी असा एकूण 6 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत. अर्जुन तुकाराम झाडे (वय-22) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Pune Crime News)

वारजे माळवाडी परिसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विद्यार्थ्यांनी बुट अथवा दरवाजाजवळ ठेवलेल्या चावीचा वापर करुन विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरुन नेण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करुन आरोपीला अटक करण्याच्या सूचना तपास पथकाला देण्यात आल्या होत्या.

तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील घटनस्थळावरील आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासत असताना संशयित आरोपीची माहिती पथकाला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe) तांत्रिक विश्लेषण द्वारे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना आरोपीची माहिती मिळाली. तपास पथकाने आरोपी अर्जुन झाडे याला राहत्या खोलीतून ताब्यात घेतले. त्याच्या रुमची पाहणी केली असता लॅपटॉप आढळून आले. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. रुममध्ये सापडलेल्या लॅपटॉपची पाहणी केली असता गुन्ह्यात चोरीला गेलेला लॅपटॉप आढळून आला. आरोपीने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. (Pune Crime News)

शहरात अनेक ठिकाणी चोरी

आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने पुणे शहरातील वारजे, कर्वेनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड परिसरातून लॅपटॉप चोरी केल्याचे उघडकीस आले. तसेच त्याने यापूर्वी रायगड येथे शिक्षण घेत असताना महाड व मानगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 12 लॅपटॉप, 7 लॅपटॉप चार्जर, 1 सोनी कंपनीचा कॅमेरा, 1 हेडफोन, 2 दुचाकी असा एकूण 6 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील (IPS Pravin Patil),
परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे
(ACP Bhimrao Tele), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर (Sr. PI Sunil Jaitapurkar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत, गोविंद फड,
विक्रम खिलारी, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Bhide Wada Smarak | भिडे वाड्यातील भाडेकरूंचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले ! महिन्याभरात वाडा खाली करा अन्यथा पालिकेला भूसंपदानाचे सर्व पर्याय खुले राहतील

Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र