Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत थरार ! हत्याराचा धाक दाखवुन भरदिवसा व्यापार्‍याचे 47 लाख लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत (Nana Peth, Pune) भरदिवसा हत्याराचा धाक दाखवुन आणि झटपाट करून व्यापार्‍याकडील 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 चेक मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी जबरदस्तीने लुटले आहेत (Robbery In Pune). दिवसाढवळया आणि गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी (Pune Police) धाव घेतली आहे. (Pune Crime News)

यासंदर्भात मंगलपूरी भिमकपूरी गोस्वामी (55, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोस्वामी हे पन्ना एजन्सी या दुकानात नोकरी करतात. दुकानातील व्यवसायाची एकुण रक्कम 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 हे एका पिवळसर रंगाच्या बॅगमध्ये घेऊन गोस्वामी हे अ‍ॅक्टीव्हावरून घेऊन जात होते. गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते नाना पेठेतील सिटी सर्व्हे नंबर 395 ब येथील सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना काळया रंगाच्या दुचाकीने त्यांना मागुन धक्का दिला. चोरटयांनी त्यांची गाडी फिर्यादीच्या समोर आडवी घालून त्यांना हाताने मारहाण केली. लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन गोस्वामी यांच्याकडील बॅग आणि त्यामध्ये असलेली रोख रक्कम आणि चेक हे जबरदस्तीने लुटले. काही क्षणातच चोरटयांनी तेथून पळ काढला. (Pune Crime News)

झालेल्या मारहाणीत गोस्वामी यांच्या उजव्या हाताला खरचटले असुन पाठीला मुका मार लागला आहे.
त्यांना ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेतील अधिकारी (Pune Police Crime Branch) व समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

दिवसाढवळया नाना पेठेत अगदी गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून व्यापार्‍यांमध्ये
चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Thrill in Nana Peth Pune! 47 lakhs were robbed from a trader in broad daylight by showing fear of weapon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Aam Aadmi Party (AAP) Letter To Chandrakant Patil | पुणे : आम आदमी पार्टीकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना खुले पत्र, ‘आप’ म्हणतंय – ‘दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !’

MP Sanjay Raut | शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची नेतेपदी निवड

Jalgaon ACB Trap | 5 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी तलाठयासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Congress Mohan Joshi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी