Pune Crime | मांजरी परिसरात ‘कोयता गँग’ची दहशत, स्थानिकांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन; हडपसर पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात तसेच उपनगर परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील मांजरी येथे कोयता गँगने (Koyta Gang) दहशत पसरवली असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निवेदन दिले असून, या निवेदनाची प्रत हडपसर पोलिसांना दिली आहे. यावेळी (Pune Crime) स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता गँगने दहशत पसरवली आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याने जो ग्रामस्थ त्यांना विरोध करतो त्यांच्या घरावर दडगफेक केली जात आहे. कोयता गँगच्या दहशतीमुळे स्थानिक ग्रामस्थ तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. हडपसर पोलीस या टोळीवर अंकुश ठेवण्यात कमी पडत असल्याने मांजरी येथील स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात एकत्र जमून याचा निषेध नोंदवला. (Pune Crime)

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मांजरी (Manjari), काळेपडळ (Kalepadal), गंगानगर (Ganganagar) या परिसरात गुन्हेगारांच्या टोळ्यांचा वावर वाढला आहे. या भागात आपल्या टोळीचे वर्चस्व राहावे,
यासाठी दोन टोळ्यांमध्ये वाद होत असतात. यादरम्यान मांजरी परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असून,
याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अडवून त्यांना लुटणे,
महिलांचे दागिने लुटणे, हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करणे अशा घटनांमुळे मांजरी येथील नागरिक
भयभीत झाले आहेत. नागरिकांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली.
परंतु कोयता गँगची दहशत कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.
टोळीतील सदस्याला विरोध केला तर विरोध करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत या टोळीची मजल गेली आहे.

मांजरी परिसरातील कोयता गँगवर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार केली असता, पोलिसांकडून आरोपींची बाजू
घेतली जात आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगून पोलिसांकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे.
मांजरी येथील ग्रामस्थांनी हडपसर पोलीस ठाण्यात एकत्र जमून या टोळीवर कारवाई करावी,
अन्यथा पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढू ,असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.

Web Title :- Pune Crime | Terror of ‘Koyta Gang’ in Manjari area, statement of locals directly to Chief Minister Eknath Shinde; Allegation that Hadapsar police is not taking action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update