Pune : पोलीस दलातील (CID) रेखाचित्र प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संशयित आरोपींचे रेखाचित्र काढण्यासाठी आणि गुन्ह्याची उकल होण्यास मदत होण्यासाठी पुण्यात रेखाचित्र कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या 18 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी व कुलगुरू प्राध्यापक डॉ. नितीन करमाळकर यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 21 मे रोजी कोरोनाचे नियम पाळून पार पडला.

हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. नितीन करमाळकर, गुन्हे अन्वेषण विभाग अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संभाजी कदम व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अविनाश कुंभार, एच ओ डी रसायन शास्त्र विभाग व प्राध्यापक सुरेश गोसावी भौतिकशास्त्र विभाग आदी उपस्थित होते.

सामाजिक परिस्थितीनुसार गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. सामाजिक परिवर्तन लक्षात घेता समाजामध्ये गुन्हे हे कालानुरूप घडत जाणार आहे. तंत्रज्ञान गुन्हेगार व्यक्तीला सहज उपलब्ध होते व त्याचा दुरुपयोग केला जात आहे. पंधरा ते वीस वर्षापूर्वीचे गुन्ह्यातील फरार आरोपी सद्यस्थितीमध्ये कसा दिसत असेल, त्याच्या विविध रूपांची रेखाचित्रे काढणे. गुन्हा करून फरार झालेला गुन्हेगार व महत्त्वाची ओळख पटविणे आणि करोडो लोकांमधून त्याला शोधून काढणे हे अत्यंत अवघड काम आहे.

याशिवाय सीसीटीव्ही फुटेज मधील स्पष्ट दिसणारी व्यक्ती व्हिडिओ एडिटिंग तंत्रज्ञानाच्या साह्याने त्याची स्पष्टता व त्यावरून त्या व्यक्तीचे रेखाचित्र रेखाचित्र रेखाटन व गरज वाटल्यास त्याचे शिल्प तयार करणे, पोलिस यंत्रणेला गुन्हे आणि तपास तपास कामी वर्णनावरून गुन्हेगारांचे रेखाचित्र काढून काढून घेणे हे अनिवार्य ठरणार आहे. त्यासाठी रेखा चित्रकाराची गरज महत्त्वाची आहे.

तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांच्या निर्देशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभाग मुख्यालय पुणे या ठिकाणी हे अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य अतुलचंद्र कुलकर्णी यांनी रेखाचित्र कक्षाची स्थापना केली. याठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण विभाग अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षित करण्याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालकांनी मानस व्यक्त केला होता. त्यानुसार 83 पोलीस अधिकारी व अंमलदार यांची प्रशिक्षणसाठी निवड करण्यात आली होती.

रेखाचित्र विभागाचे विभागाचे महत्व अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमाळकर यांनी जाणले. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे प्रमाणपत्र देण्याबाबत गुन्हे अन्वेषण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात समन्वय करार झाला होता.

महाराष्ट्र पोलीस दलातील पुणे ग्रामीण 2, पुणे शहर 5, व गुन्हे अन्वेषण विभागाकडील 10 व सीपीआर कडील 2 अधिकारी असे महाराष्ट्र पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे 55 दिवस म्हणजेच 275 तासांचे प्रशिक्षण देण्यात आले. या अधिकारी व पोलिसांनी कोरोनाच्या काळातील बंदोबस्त व इतर नियमित कामकाज पाहून 1 फेब्रुवारी 2021 ते दिनांक 22 एप्रिल 2021 या दरम्यान प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करुन 21 मे रोजी प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी व कुलगुरू प्राध्यापक डॉ. नितीन करमाळकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

गुन्हा करून फरार झालेल्या संशयित आरोपींची तसेच सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित व्यक्तींचे भविष्यामध्ये प्रशिक्षित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेकडून रेखाचित्र रेखाटन करून गुन्हे उघडकीस येण्यास निश्चित मदत होणार आहे. तसेच गुन्ह्यांचे दोष सिद्धीचे प्रमाण वाढण्यासही मदत होणार आहे. सदर प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्याकरिता भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. गिरीश चरवड यांची नेमणूक करण्यात आलेली होती. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रत्येक प्रशिक्षण सत्राचे शेवटी प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेण्यात आली. प्रशिक्षणार्थी यांनी काढलेल्या रेखा चित्रांचे तज्ज्ञ परिक्षक समीर धर्माधिकारी चित्रकार ॲडव्हर्टायझिंग हेड सारांश ॲडव्हर्टायझिंग पुणे व नुपुर मोहांकर ग्राफिक डिझायनर पुणे यांनी परीक्षण करून त्यांचे मूल्यमापन केले. परीक्षक यांनी प्रशिक्षणार्थी यांनी अत्यंत कमी कालावधीत उत्कृष्ट प्रगती केल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

अविनाश कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अनुजा देशमाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच संभाजी कदम पोलीस अधीक्षक आभार व्यक्त केले.