Pune Drug Racket Hub | सुसंस्कृत पुणे शहर बनतंय ड्रग्स हब?, गेल्या 10 महिन्यात कोट्यावधींचं ड्रग्स जप्त, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Racket Hub | पुण्यातील ड्रग्स माफिया (Drug Mafia) ललित पाटील (Lalit Anil Patil) ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) पळून गेल्याचे प्रकरण सध्या सुरू असताना शिक्षणाच्या माहेरघरात गेल्या 10 महिन्यात तब्बल 14 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. शांत, सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराची ओळख ‘ड्रग्स हब’ बनू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शिक्षणाच्या माहेरघरात तरुण पीढी ड्रग्सच्या विळख्यात सापडली आहे की काय? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. (Pune Drug Racket Hub)

पुणे शहरामध्ये गेल्या 10 महिन्यात तब्बल 14 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. शिक्षणाच्या माहेर घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स कोठून येते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांकडून ड्रग्सची तस्करी करणाऱ्यावर कारवाई करुन ड्रग्स जप्त केले जात आहे. पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरुन महाराष्ट्रात येत आहे. नायजेरिया, घाना, राजस्थान, आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात गांजा आणि मेफेड्रोनचा पुरवठा राज्यात केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Drug Racket Hub)

तरुणवर्ग अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे राज्यात अंमली पदार्थाची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ड्रग्सचे व्यसन पूर्वी उच्चभ्रू लोकांमध्ये मर्यादित होते. परंतु आता याचा विळखा वाढला असून मोठमोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत हे पोहचला आहे. नवीन पब संस्कृतीमुळे मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याचे आढळून आले आहे. ड्रग्सच्या माध्यमातून करोडो रुपयांची कमाई होत असल्याने यामध्ये अनेक दलाल सक्रिय आहेत.

ड्रग्स विक्रीसाठी इंटरनेटचा वापर

राज्यात अंमली पदार्थ विक्रीवर बंदी असताना राज्यात ड्रग्ससह इतर सर्व अंमली पदार्थांची बेधडक विक्री सुरु आहे. ड्रग्स, गांजा यासारख्या अंमली पदाची विक्री करण्यासाठी ड्रग्स तस्कर इंटरनेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या ललित पाटील पलायन प्रकरणाच्या मुळाशी देखील मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी हाच विषय आहे. गेल्या 10 महिन्यात पुण्यात तब्बल 1038 किलो गांजा तर 120 किलो अफिम जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी गेल्या दहा महिन्यामध्ये 14 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.

अमली पदार्थ जप्त आकडेवारी

मेफेड्रोन: 7 कोटी 91 लाख 66 हजार (39 गुन्हे)
गांजा: 3 कोटी 7 लाख 90 हजार (50 गुन्हे)
एल एस डी: 1कोटी 12 लाख 64 हजार (2 गुन्हे)
चरस: 48 लाख 2 हजार (4 गुन्हे)
अफिम: 47 लाख 82 हजार (9 गुन्हे)
हेरॉईन: 46 लाख 89 हजार (1 गुन्हे)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Maratha Community-Kunbi Certificate | मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं की नाही? या प्रश्नावर शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar | ‘फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले’