Pune Ganesh Visarjan Procession | बाप्पाच्या विसर्जनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या कशी असेल वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganesh Visarjan Procession | गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहरातील वाहतूक मार्गात मोठा बदल (Traffic Route Change) करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.9) सकाळी नऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूक (Pune Ganesh Visarjan Procession) सुरु होणार आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व सोयीच्या दृष्टीने शहराच्या मध्यवस्तीसह मिरवणूक मार्गावरील रस्ते शुक्रवारी सकाळी 7 पासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

पुण्यातील बंद असलेले रस्ते

गणेश रस्ता (Ganesh Road) – दारुवाला पूल ते जिजामाता चौक
लक्ष्मी रस्ता (Lakshmi Road) – संत कबीर चौक ते टिळक चौक
बाजीराव रस्ता (Bajirao Road) – बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौक
कुमठेकर रस्ता (Kumthekar Road) – टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
शिवाजी रस्ता (Shivaji Road) – काकासाहेब गाडगीळ जंक्शन ते जेधे चौक
बगाडे रस्ता (Bagade Road) – सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक
जंगली महाराज रस्ता (Jungli Maharaj Road) – झाशी राणी चौक ते खंडुजी बाबा चौक
टिळक रस्ता (Tilak Road) – जेधे चौक ते टिळत चौक
केळकर रस्ता (Kelkar Road) – बुधवार चौक ते टिळक चौक
शास्त्री रस्ता (Shastri Road) – सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक (Tilak Chowk)
गुरु नानक रस्ता (Guru Nanak Road) – देवजीबाब चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक

शुक्रवारी 12 नंतर ‘हे’ रस्ते बंद होणार

सोलापूर रस्ता (Solapur Road) – सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
पुणे सातारा रस्ता (Pune Satara Road) – व्होल्गा चौक ते जेधे चौक
कर्वे रस्ता (Karve Road) – नळस्टॉप चौक खंडुजीबाब चौक
फर्ग्युसन रस्ता (Fergusson Road) – खंडुजीबाब चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट
प्रभात रस्ता (Prabhat Road) – डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक

वाहतूक वळवली जाणारे ठिकाण

जंगली महाराज रस्ता – झाशी राणी चौक
नेहरु रस्ता – संत कबीर पोलीस चौकी
शिवाजी रस्ता – स.गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा
सोलापूर रस्ता – सेव्हन लव्हज चौक
मदलीयार रस्ता – अपोलो टॉकीज
कर्वे रस्ता – नळस्टॉप
सातारा रस्ता – व्होल्गा चौक
बाजीराव रस्ता – पुरम चौक
लाल बहादुर शास्त्री रस्ता – सेनादत्त पोलीस चौकी
फर्ग्युसन कॉलेज रस्ता – गुडलक चौक

नो पार्किंगचे (No parking) ठिकाणे

शुक्रवारी सकाळी आठ पासून मुख्य मिरवणूक संपेपर्यंत (Pune Ganesh Visarjan Procession) लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन रस्ता, खंडुजी बाबा चौक ते वैशाली हॉटेल दरम्यान जोणारा उपरस्ता परिसरातील 100 मीटर परिसरात वाहने पार्क करता येणार नाहीत.

या ठिकाणी असेल पार्किंग

एच.व्ही. देसाई कॉलेज, पुलाची वाडी नदी किनारी, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या बाजूला, दारुवाला पुल ते खडीचे मैदान, गाडीतळ पुतळा ते कुंभार वेस, काँग्रेस भनव मनपा रस्ता, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता, हमालवाडा पार्किंग नारायण पेठ

Web Title :- Pune Ganesh Visarjan Procession | Pune Police traffic has been diverted for ganesh visarjan procession in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Yakub Memon Grave | याकूब मेमन कबरीवरुन राजकारण तापलं ! मग तुम्ही दाऊदला समर्थन करता का?, भाजपच्या आरोपांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime | कोथरुडमध्ये ATM मधून पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने 76 वर्षाच्या ज्येष्ठाची फसवणूक

Gold Rate Today | सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Pune Accident News | चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यु