Pune Ganeshotsav 2022 | गणेश विसर्जनासाठी यंदा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही – जलसंपदा विभागाची स्पष्टोक्ती

पुणे : Pune Ganeshotsav 2022 | यंदा गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांमध्येचे श्रींचे विसर्जन करावे लागणार आहे. दरम्यान, धरणक्षेत्रात विश्रांती घेतलेला पाऊस परतला असून जोरदार पाऊस सुरुच राहिला, तर मात्र धरणांमधून पाणी सोडले जाईल, असेही जलसंपदाने स्पष्ट केले. (Pune Ganeshotsav 2022)

‘गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात कमी झाला आहे. गुरुवार आणि शुक्रवार धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसे, झाल्यास धरणांमधून नदीत पाणी सोडण्यात येईल. खास गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही’, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे सहायक अभियंता यो. स. भंडलकर यांनी सांगितले. (Pune Ganeshotsav 2022)

यंदा गणेश विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही. धरणांत पाऊस नसल्याने यंदा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नाही.

– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

दरवर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक गणेश
मंडळांसह घरगुती श्रींचे विसर्जन नदीत करण्यात येते. मात्र, यंदा धरणामधून पाणी सोडण्यात येणार नाही.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण
पाणीसाठा २९.०२ टीएमसी (९९.५७) टक्के झाला आहे. चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतानाही
गणेश विसर्जनासाठी यंदा पाणी सोडण्यात येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title :- Pune Ganeshotsav 2022 | There is no plan to release water from the dam for Ganesh Visarjan this year – a statement from the Water Resources Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | आर्थर रोड जेल प्रशासनाने उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांची भेट नाकारली

LIC New Policy | LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लान, जाणून घ्या लाभ, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील