Pune Lok Sabha | कोथरूड मतदार संघात काँग्रेसचा घरेलू कामगार मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha | पुणे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडीया आघाडीचे (India Aghadi) उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ घरेलु कामगार, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रतिभाताई रवींद्रभाऊ धंगेकर, माजी नगरसेवक चंदुशेठ कदम, माजी नगरसेवक संजय बालगुडे, स्नेहल पाडळे, घरेलु कामगार संघटनेच्या अध्यक्ष किरणताई मोघे ह्यांनी ह्या मेळाव्यासाठी जमलेल्या महिलांना मार्गदर्शन केले.(Pune Lok Sabha)

महागाई, बेरोजगारी, समाजातील वाढलेला असंतोष ह्या विरोधात मतदान करण्याचे व राविंद्रभाऊ धंगेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सर्व वक्त्यांनी केले. ह्या मेळाव्यास महा. काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखी, शिवसेना महिला शहर प्रमुख सवीताताई मते, युक्रांदचे संदीप बर्वे कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे,कोथरूड काँग्रेस महीला अध्यक्ष मनीषाताई करपे, कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष ज्योतीताई सुर्यवंशी, राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे शहर उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, छायाताई भोसले,आरती गायकवाड, शितलताई जाधव, भोपळे ताई, लोणकर ताई,रंजना पवार, निता पाटोळे, पुजा चव्हाण,युवराज मदगे, महेश विचारे, बंटी जाधव, पिंटु वराडे, हनुमंत गायकवाड, विकी कांबळे, थोरात, अंकुश आडसुळ, किरण आडागळे, नागेश गायकवाड, दयानंद घोडके, किरण मारणे, प्रीती मारणे, सवीता ताई डाहळे, निगडे काका, पुष्पा गोळे,जाधवताई, सुनीताताई आखाडे, माने मावशी, अरुण नाईकनवरे, राजु कंधारे ऋषिकेश मारणे उपस्थित होते.सदर मेळाव्याचे आयोजन हे किशोर मारणे, अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष कंत्राटी कामगार मजदूर कोंग्रेस व सुरेखा मारणे सरचिटणीस पुणे शहर महीला कोंग्रेस यांनी केले होते. सूत्रसंचालन राजीव गांधी पंचायत राज संघटन सरचिटणीस संदीप कुदळे यांनी केले. प्रास्ताविक किशोर मारणे यांनी केले व आभार प्रदर्शन ज्योतीताई सुर्यवंशी यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe – Shivajirao Adhalrao Patil | निवडणूक प्रचारात कोल्हे-आढळराव आमनेसामने ! हरिनाम सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉ. कोल्हेंच संपुर्ण भाषण

Murlidhar Mohol | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेपूर्वी मुरलीधर मोहोळ म्हणाले, येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी…