Pune Lonikand Crime | पुणे : धक्कादायक! तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand Crime | पुण्यातील वाघोली परिसरात एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या 25 वर्षीय नराधमाला लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार सोमवारी (दि.25) दुपारी तीनच्या सुमारास घडला.(Pune Lonikand Crime)

याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन बालाजी बोयवार (वय-25 रा. वाघोली) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या वाघोली येथील एका बांधकाम साईटवर काम करत असून त्याच ठिकाणी राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी झोपली असताना आरोपी त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रंग लावण्याच्या बहाण्याने विनयभंग

कोथरुड : रंग लावण्याच्या बहाण्याने दुकानात शिरुन एका 21 वर्षीय तरुणीसोबत अश्लील कृत्य करुन विनयभंग
केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात
(Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तेजस कांबळे, अजय महाजन, यश विटे (सर्व रा. कोथरुड)
यांच्यावर आयपीसी 354, 352, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.25) सकाळी साडे
दहा वाजण्याच्या सुमारास घडला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एम. काळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs Ajit Pawar NCP | तटकरेंचा कडेलोट केला तर तुम्हाला विधानसभा निवडणुकीत हत्तीच्या पायी तुडवू, रायगडमध्ये महायुतीत वाद, मावळच्या निवडणुकीवर परिणाम होणार?

Shivajirao Adhalrao Patil | अजित पवार, वळसे-पाटलांच्या उपस्थितीत आज आढळराव राष्ट्रवादीत जाणार, महायुतीची मोठी खेळी! शरद पवारांना शह

Symbiosis Boys Hostel | पुणे : सिंम्बॉयसिस बॉईज होस्टेलमध्ये तरुणाच्या अंगावर अ‍ॅसिड सदृश रसायन फेकले