Pune Lonikand Crime | पुणे : सासरी येण्यास नकार दिल्याने पत्नीवर वार, पतीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand Crime | सासरी येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना लोणीकंद परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.29) दुपारी दीडच्या सुमारास लोणीकंद येथील जगताप वस्ती येथे घडला आहे.

याबाबत 25 वर्षीय महिलेने शुक्रवार लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन आरोपी पती अतुल उर्फ अर्जुन हनुमंत लंगडे (वय-28 रा. खडकवाडी, ता. मानवत जि. परभणी) याच्यावर आयपीसी 324, 326 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या माहेरी असताना आरोपी गुरुवारी दुपारी घरी आला. त्याने महिलेला तू घरी येणार आहे का नाही अशी विचारणा केली. त्यावेळी महिलेने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने हातातील चाकूने महिलेच्या पोटावर वार करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Lonikand Crime)

अल्पवयीन मुलाला दगडाने मारहाण

कोंढवा : दारु पिण्यासाठी शंभर रुपये देण्यास नकार दिल्याने दोन जणांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी व डोक्यात दगड मारुन जखमी केले.
हा प्रकार गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी रोड येथे घडला आहे.
याप्रकरणी जखमी झालेल्या मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन अरबाज आयुब खान उर्फ खड्डा भाई (वय-25), अबरार आवटी (वय-19 दोघे रा. हांडेवाडी रोड, पुणे)
यांच्यावर आयपीसी 324, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे
(PSI Vaibhav Sonawane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे