Pune Metro Structural Audit | पुणे मेट्रो स्थानके आहेत पूर्णपणे सुरक्षित; सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा अहवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Pune Metro Structural Audit) करण्याची जबाबदारी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाकडे (COEP University of Technology) होती. नुकताच हा अहवाल प्रसिद्ध झाला असून यामध्ये पुणे मेट्रोला पूर्णपणे हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. सीओईपीने केलेल्या या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये (Pune Metro Structural Audit) मेट्रो स्थानके सुरक्षित असल्याचे निरीक्षण मांडले आहे. (Pune Metro News)

पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी मेट्रो स्टेशनच्या (Metro Sstations) उभारणीत आढळलेल्या त्रुटी समोर आणल्या होत्या. व उच्च न्यायालयात जनहित याचिका (Public Interest Litigation) दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात १७ एप्रिलला झालेल्या सुनावणीमध्ये सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून सात दिवसांत अहवाल सादर करण्यात यावा असे न्यायालयाने (High Court) सांगितले होते. यानुसार, विद्यापीठाकडून मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.

अहवाल सादर करण्यास खूप उशीर केल्याने सीओईपीवर शंका उपस्थित करण्यात आल्या.
मात्र आता हा अहवाल सादर करण्यात आला असून प्राध्यापक बी.जी. बिराजदार (B.G. Brajdar) यांच्या नेतृत्वाखाली हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये काही प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता. बिराजदार यांनी मेट्रोला स्ट्रक्चरल ऑडिटचा पाहणी अहवाल सादर केला होता. या अहवालात मेट्रो स्थानकांबाबत काही तांत्रिक मुद्दे (Technical Issues) उपस्थित करण्यात आले होते. त्याला महामेट्रोकडून (Maha Metro) उत्तर देण्यात आले. त्यानंतर पुन्हा तपासणी करून अखेर अंतिम अहवाल महामेट्रोला सादर करण्यात आला आहे.

या नवीन अहलावात काही महत्त्वाचे मुद्दे सीओईपीने मांडले आहेत.
यामध्ये मेट्रोची स्थानके (Metro Stations) पूर्णपणे सुरक्षित असल्याचा स्पष्ट निर्वाळा देण्यात आल्याचा
महामेट्रोचा दावा आहे. सीओईपीच्या टीमने या प्रत्येक स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे निरीक्षण (Observation)
मांडले आहे. तसेच स्थानकांच्या संरचनेचे विश्लेषण करून त्यांच्या भूकंपरोधक क्षमतेची (Earthquake Resistance)
पडताळणी करण्यात आली आहे.
मेट्रो स्थानकांची पर्याप्त सुरक्षेद्वारे आखणी करण्यात आल्याचे अहवालात निरीक्षण मांडण्यात आले आहे. . (Pune Metro Structural Audit)

Web Title : Pune Metro Structural Audit | Pune metro stations are completely safe; COEP University of Technology Report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | ‘बाहेरून कीर्तन आतून तमाशा’, केजरीवाल यांच्या भेटीवर विखे पाटलांची विरोधकांवर टीका

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन परस्पर हडप केली 50 लाखांहून अधिक रक्कम; पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमधील गडबड घोटाळा, 8 जणांवर गुन्हा दाखल

Pune Triple Talaq Case | पुणे ट्रिपल तलाक केस : विवाहीतेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीला अटक ! सासु, सासरे, नणंद व नंदावाची अटकपुर्वसाठी न्यायालयात धाव