Pune Mundhwa Police | दुचाकीस्वाराला भररस्त्यात मारहाण करुन लुटले, दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mundhwa Police | दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला रिक्षातून आलेल्या चार जणांनी अडवून मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील सात हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.29) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास केशवनगर येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. (Arrest In Robbery)

याबाबत युक्तीकुमार सारंगपाणी निंबाळकर (वय-43 रा. पुनावळे इमारत महाराष्ट्र चौक, शिंदेवस्ती, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मुंढवा पोलिसांनी चार जणांवर आयपीसी 397, 394, 341, 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अक्षय आण्णासाहेब शिंदे (वय-25) व महेंद्र एकनाथ शेलार (वय-45 दोघे रा. काळेपडळ, हडपसर) यांना अटक केली आहे.(Pune Mundhwa Police)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरुन केशवनगर येथील सार्वजनिक रोडवरुन जात होते. त्यावेळी रिक्षा (एमएच 12 जेएस 4075) चालकाने त्यांना अडवले. जवळ कोठे हॉटेल आहे, जवळ आहे का असे बोलण्यात गुंतवून रिक्षातील चार जणांनी खाली उतरून फिर्यादी यांची गचांडी धरुन झटापट केली. तसेच हाताने मारहाण करुन खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना विरोध केला असता आरोपींनी दगड डोक्यात मारुन जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेऊन पळून गेले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंढवा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.
तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्राप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला.
केशवनगर पोलीस चौकी भागात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश पाठक यांना माहिती मिळाली की,
गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ही कल्याणी बंगला रोड मोकळ्या मैदानात उभी आहे.
त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील
यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब टापरे, पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे,
सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, देवानंद खाडे,
सचिन मेमाणे, निलेश पालवे, सचिन पाटील, दयानंद गायकवाड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB FIR On Sales Tax Officer | विक्रीकर अधिकाऱ्याकडून 16 बोगस कंपन्यांना कर परतावा, 175 कोटी 93 लाखांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी एसीबीकडून गुन्हा दाखल

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चाकण परिसरातील घटना