Pune News | शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. (Pune News)

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद दिलीप ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलगा यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. (Pune News)

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, सुनिल कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (नि.), उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे(नि.), लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

कारगिल येथे देशसेवा बजावत असताना ३ सप्टेंबर रोजी दिलीप ओझरकर शहीद झाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Edible Oil Prices | सणासुदीच्या आधी गृहिणींसाठी आनंदाची बातमी: तेलाच्या किमतीबाबत आली अपडेट

Pune Crime News | खोटे कागदपत्र तयार करुन जागा बळकावली, 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR; पर्वती परिसरातील घटना

‘मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा २०२३’ थाटात संपन्न ! मंगळागौरी क्वीन्स स्पर्धा 2023′ या भव्य स्पर्धेत गौराई, कात्रज या संघाने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली