Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडी नेल्याच्या गैरसमजातून तरुणावर चाकूने वार, खडकी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकी नेल्याच्या गैरसमजातून एका तरुणासोबत वाद घालून चाकूने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार येथील गणपती मंदिरासमोर घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत किरण अनिल खुडे (वय-20 रा. राजीव गांधी नगर, खडकी बाजार, पुणे) याने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली. यावरून ऋषिकेश उर्फ रितु तायडे, हितेश (रा. राजीव गांधीनगर, खडकी बाजार, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 504, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी (दि.26) आरोपी रितु याचा मित्र लकी हा दुचाकी घेऊन गेला होता. मात्र, दुचाकी किरण खुडे हा घेऊन गेल्याचा गैरसमज रितु याचा झाला. यातूनच रितू आणि किरण यांच्यात वाद झाला होता. याच वादाचा राग आरोपीच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास किरण खुडे हा खडकी बाजार येथून जात होता. त्यावेळी रितु याने किरण याला पकडून शिवीगाळ केली. तसेच सोबत आणलेल्या चाकूने किरण याच्यावर वार केला. मात्र, त्याने वार चुकवल्याने चाकू हनुवटीवर लागला.

किरण तेथून पळू जाऊ लागला असता रितु याने किरणच्या डोक्यात चाकूने वार करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी जमलेल्या लोकांकडे पाहून हातातील चाकू हवेत फिरवून ‘तुम्हाला रितु भाईची भिती वाटत नाही का?
मारुन टाकल्यानंतर समजेल’ अशी धमकी देत परिसरात दहशत पसरवली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कंपनीच्या कामावरुन दोन टोळक्यांमध्ये हाणामारी, सराईत गुन्हेगारासह 6 जणांना अटक; विमाननगर परिसरातील घटना

पुणे : ब्रेकअप केल्याच्या रागातून भररस्त्यात तरुणीला प्रियकराकडून मारहाण

पुणे : ब्रॅण्डेड कंपनीचा बनावट लोगो लावून कपड्यांची विक्री, दोन लाखांचे कपडे जप्त

‘तुला जास्त मस्ती आली का’ म्हणत तरुणावर सपासप वार, दोन सराईत गुन्हेगारांना अटक; भवानी पेठेतील घटना

Pune Police MCOCA Action | शरद मोहोळ खून प्रकरण : मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर ‘मोक्का’