Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट वेबसाईट तयार करुन बुकिंग घेऊन अ‍ॅम्बी व्हॅलीची होतेय फसवणूक

पुणे : हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅम्बी व्हॅली सिटीच्या (Amby Valley City) नावाशी साधर्म दर्शविणारी बनावट वेबसाईट (Fake Website) तयार करुन त्यावरुन बुकिंग घेऊन अ‍ॅम्बी व्हॅलीची फसवणूक (Cheating Fraud Case) होत असल्याचा प्रकार समोर आला आहे, याबाबत कायदेशीर व्यवस्थापक शिवाजी व्यवहारे (रा. नवी सांगवी) यांनी पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) फिर्याद दिली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु असल्याचे आढळून आले असून त्याचा कंपनीला पत्ताच नसल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारा अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे आलेल्या ग्राहकांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था पाहणे, ग्राहकांचे बुकिंग घेणे, त्या मोबदल्यात लॉजिंग, रेस्टॉरंन्ट सेवा पुरविणे हे काम असते. त्या करीता कंपनीकडून अ‍ॅम्बी व्हॅली सिटी डॉट कॉम ही अधिकृत वेबसाईट आहे. त्याद्वारे बुकिंग घेतले जाते. बुकिंग रक्कम कंपनीच्या बँक अकाऊंटला जमा होते. तसेच बुकिंग करीता कंपनीकडून सब वेंडर आयबीएफडब्ल्यु हॉस्पिटालिटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही बुकिंग घेतले आग्रा येथील एक ग्राहक त्यांनी ७ सप्टेंबर रोजी फोन करुन आपण ७५ हजार रुपये भरुन बुकिंग केल्याचे सांगितले.

त्यांच्याकडून माहिती घेतल्यावर कोणीतरी कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन परस्पर बुकिंग घेऊन फसवणूक करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अ‍ॅम्बीव्हॅलीसिटी डॉट ऑनलाईन या नावाची बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे एका ग्राहकांकडून ३८ हजार, ५ हजार, १३ हजार, ८ हजार असे पैसे घेऊन ग्राहकांची फसवणूक केली. हा प्रकार १२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान घडला होता. या दोन्ही वेबसाईट अजूनही चालू आहे. बनावट वेबसाईटवरुन बुकिंग घेऊन कंपनीची बदनामी केल्याने कंपनीच्या वतीने फिर्याद दिली असून पौड पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन तो ग्रामीण पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडीच्या घटना, सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास