Pune Pimpri Chinchwad Crime News | गोळीबार करुन सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला अटक; पुणे ग्रामीण पोलिसांकडून तीन पिस्टल व दोन काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफा व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून तीन पिस्टल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सिंहगड किल्ल्याच्या जंगलात करण्यात आली. शरद बन्सी मल्लाव (वय-24 रा. काची आळी, शिरुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

शिरुर शहरातील मुख्य सराफ बाजार पेठेतील सुभाष चौकात जगन्नाथ कोलथे ज्वेलर्सचे दुकान आहे. दुकानाचे मालक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका एकनाथ पंडीत (वय-50) हे रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पिस्तूलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भिका पंडीत यांनी चोरट्यांना विरोध केला असता त्यांनी पंडीत यांच्या डोक्यात पिस्टलचा बट मारला व त्यांच्यावर पिस्तूलातून गोळी फायर केली. याबाबत भिका पंडीत यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी घडला होता.

दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित आरोपी रेकॉर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान हा गुन्हा शरद मल्लाव व त्याचा साथीदार सागर उर्फ बबलु दत्तात्रय सोनलकर (रा. धायरी) यांनी केल्याची माहिती मिळाली.

आरोपींचा शोध घेत असताना आरोपी सिंहगड किल्ल्याच्या जंगलात लपून बसल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पथकाने जंगलातून गुन्ह्यातील मुख्य आरोपी शरद मल्लाव याला अटक केली. त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर त्याचा साथीदार जखमी असून त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याने त्याला अटक केली नाही.

दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. शरद मल्लाव याच्यावर शरीराविरुद्ध व बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे सात
गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुणे ग्रामीण जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक
वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आरोपी सागर उर्फ बबलु सोनलकर याच्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी
यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी,
अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे,
योगेश नागरगोजे, दिपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे, तसेच शिरुर पोलीस ठाण्याचे
पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई
यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुजवटे व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

चैनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्याला हिंजवडी पोलिसांकडून अटक, 12 दुचाकी जप्त

मुंढवा पोलिसांनी जपली माणुसकी! पोलिसांनी घडविली आई-मुलाची तब्बल 12 वर्षानंतर भेट