Pune Pimpri Chinchwad Crime News | मित्राला दगडाने मारहाण, दोघांवर FIR; स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भाईगिरीच्या गप्पा मारत असताना झालेल्या वादातून दोघांनी एका तरुणाला दगडाने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार स्वारगेट परिसरातील शिवनेरी रोड येथील ट्रक पार्कींग येथे सोमवारी (दि.22) रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडला आहे. याबाबत स्वारगेट पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत हर्ष कैलास कांबळे (वय-20 रा. कैकाडी मित्रमंडळासमोर, पुणे) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सौरभ नितीन आदमाने (वय-24 रा. भैरोबा मंदिराजवळ, बावधन), पवन काळे यांच्यावर आयपीसी 325, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत.
सोमवारी रात्री ट्रक पार्कींग येथे भाईगिरीच्या गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सौरभ आदमाने याने मी खुप मोठा
भाई असल्याचे म्हटले. त्यावेळी हर्ष कांबळे याने शिवीगाळ करुन तु लई मोठा भाई झालास का? असे म्हणाला.
याचा राग आल्याने आरोपींनी याचा गेम करु असे म्हणून हर्षच्या कानाचा लचका तोडला.
तसेच त्याठिकाणी पडलेला दगड हर्षच्या डोक्यात मारला. यामुळे हर्ष खाली पडला.
फिर्यादी उठून पळून जाऊ लागले असता आरोपींनी फुटलेली बाटली हातात घेऊन त्याला मारण्यासाठी अंगावर
धावून आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

President’s Medal | उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह सेवेतील 9 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर

आयएसआयएस दहशतवादी संघटनेला फायनान्स करणार्‍यास एटीएसकडून अटक; उच्च शिक्षित अभियंता हुजेफ शेखचा अनेक देशात प्रवास

Pune Balewadi Crime | WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 11 मुलींची सुटका (Video)

Pune Police Inspector Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 17 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Shivsena UBT Group | अजित पवारांनीही मोदीमुक्त रामाचे भजन खासगीत सुरू केले का? शिवसेनेचा सवाल

Rupali Chakankar | अजितदादांवर कारवाई सुरू असताना ‘काळजीवाहू ताई’ रस्त्यावर का उतरल्या नाहीत? रुपाली चाकणकरांचा सवाल