Pune Pimpri Chinchwad Crime News | भररस्त्यात अडवून तरुणीला मारहाण करुन विनयभंग, खराडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पायी घरी जाणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात अडवून विनयभंग (Molestation Case) केला. तरुणीने मदतसाठी बोलावून घेतलेल्या तिच्या दोन मित्रांना बॅनरच्या लाकडी दांडक्याने मारुन जखमी केल्याचा प्रकार खराडी परिसरात घडला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.22) रात्री एकच्या सुमारास खराडी येथील तुळजाभवानी नगरमधील लेन नं.2 येथे घडला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत खराडी परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सागर पाटील व सौरभ कोंडके व इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी 354(ड), 324, 504,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत फिर्यादी यांचे मित्र रुपेश हुंडारे व सिद्धांत सिंग जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी या सोमवारी रात्री एकच्या सुमारास लेन नं. 2 येथील सार्वजनिक रोडवरुन पायी घरी जात होत्या.
त्यावेळी आरोपी रस्त्याच्या कडेला शेकोटी करत बसले होते. त्यावेळी आरोपींपैकी एकाने फिर्यादी यांच्याजवळ येऊन
मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हटले. यावर तरुणीने बोलण्यास नकार देऊन त्या पुढे निघून गेल्या. यानंतर आरोपी साथीदाराला घेऊन पुन्हा आला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तिचे मित्र रुपेश व सिद्धांत यांना फोन करुन बोलावून घेतले.

सिद्धांत सिंग याने आरोपीकडे जाब विचारला असता आरोपींनी त्याला शिवीगाळ केली.
तर एकाने फिर्यादीच्या डोक्यात बॅनरच्या लाकडी दांडक्याने मारुन जखमी केले.
तसेच रुपेश याच्या मानेवर तर सिद्धांत याच्या हातावर खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेगर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात जल्लोषात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा (Videos)

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक