Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘कुंकूमतिलक’ होताच पतीचे प्रेमसंबंध उघड, तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘कुंकूमतिलक’ झाल्यानंतर होणाऱ्या पतीचे प्रेमसंबंध उघडकीस आले. यामुळे आपले आयुष्य बरबाद झाले असे वाटून तरुणीनं गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). ही घटना मावळ तालुक्यातील (Maval Taluka) वराळे येथे गुरुवारी (दि.2) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी विकास राजाराम धामनकर (वय-30 रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरुद्ध आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत तरुणीचा भाऊ विनायक संभाजी मराठे (वय-30 रा. वराळे, ता. मावळ) यांनी शुक्रवारी (दि.3) तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक यांच्या 29 वर्षीय बहिणीचे विकास धामनकर याच्याशी लग्न ठरले होते.
त्यांचा 14 एप्रिल 2024 रोजी कुंकूम तिलकाचा कार्यक्रम झाला होता.
त्या कार्यक्रमाचे फोटो विकास याने व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले होते.
मात्र, विकास याचे एका मुलीबरोबर प्रेम संबंध असताना देखील आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीला प्रेमसंबंधाची
कोणतीही माहिती दिली नाही. दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध असतानाही विकास याने विनायक यांच्या बहिणीसोबत
कुंकूमतिलकाचा कार्यक्रम केला. त्यानंतर लग्न करायचे नाही, असे विकास याने सांगितले.

विकासने लग्नास नकार दिल्याने फिर्यादी यांच्या बहिणीच्या मनाला वाई वाटू लागले. आपली गावात व समाजात इज्जत गेली
व आपले आयुष्य बरबाद झाल्याचे तिला वाटू लागले. यातून विनायक यांच्या 29 वर्षीय बहिणीने घरातील खोलीच्या छतास
असलेल्या लोखंडी ऐंगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विकास याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar In Baramati Lok Sabha | खास शैलीत मतदारांना पटवण्याचा अजितदादांचा प्रयत्न, ”मी पुण्याच्या सभेत मोदी-शहांशी विकासाच्या गप्पा मारत होतो, त्यांना निधी पाहिजे सांगितले”

Uttam Jankar On Ajit Pawar | उत्तम जानकारांची अजित पवारांवर खोचक टीका, ७७ हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्यांना चुना लावून बगळा केलं