Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या रागातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला बोलावून घेत त्याच्यावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना काळेवाडी (Kalewadi) येथील भैय्यावाडी भारतमाता चौकात (Bharatmata Chowk) गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) एका अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार रियान मोईन खान (वय-20 रा. जिवन चौक, काळेवाडी), मोहम्मद सिराज शहा (वय-18 रा. रहाटणी गाव, काळेवाडी) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलावर आयपीसी 324, 504, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याच राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अल्पवयीन आरोपीने फिर्यादीला भारत माता चौकात बोलावून घेतले. त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र चौकात आले असता जुन्या भांडणाच्या रागातून रियान खान याने फिर्यादीच्या कानशिलात लगावली. तर मोहम्मद शहा याने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच फिर्यादी सोबत असलेल्या मित्रावर देखील वार करुन जखमी केले. त्यानंतर तिघांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हळदीच्या कार्यक्रमात तरुणाला मारहाण

वाकड : हळदीच्या कार्यक्रमात हळद लावून कपडे खराब केल्याच्या संशयावरुन एका अल्पवयीन मुलाला उचलून आपटलं. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास थेरगाव येथील साईनाथ नगर येथे घडला आहे. याप्रकरणी जखमी मुलाच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सार्थक अर्जुन अवचार (वय-19 रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gautam Adani | गौतम अदानी यांनी खरेदी केली आणखी एक सीमेंट कंपनी, 10442 कोटीत डील फायनल; काय आहे पूर्ण प्‍लान?

NDA Modi Govt | स्वयंपाक घरासाठी गुड न्यूज, आता भाज्यांवर लक्ष ठेवणार सरकार, भाव वाढल्यास हस्तक्षेप करणार

Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार