Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करुन दहशत माजवणाऱ्या भाईच्या आवळल्या मुसक्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मी इथला भाई आहे असे म्हणत एका तरुणावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जखमी केले. तसेच हातातील कोयता हवेत फिरवून दहशत माजवली. याप्रकणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Bhosari MIDC Police Station) स्वयंघोषित भाईला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार गुरुवारी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोशी परिसरातील तापकीर नगर (Tapkir Nagar Moshi) येथे घडला आहे. (Arrest In Attempt To Kill)

दिव्यांक मारुती तलवार असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मयुर मारुती तलवार (वय-32 रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन भुषण गणेश बहिरट (वय-21 रा. तुपेवस्ती, मोशी) याच्यावर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा मोशी येथील तापकीर चौकात महाराष्ट्र कोटींग नावाचे स्प्रे पेन्टींगचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी फिर्यादी व त्यांचा भाऊ दुकानात काम करत असताना आरोपी हातात लोखंडी कोयता घेऊन आला. मी या एरियाचा भाई आहे. तु माझी गाडी आत्ताच्या आता माझ्या ताब्यात दे, नाहीतर पैसे दे असे म्हणून कोयता घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून येत मारहाण करु लागला. त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ दिव्यांक हा मध्ये आला असता आरोपीने कोयता भावाच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच हातातील कोयता हवेत फिरवून मोठ मोठ्याने शिवीगाळ करुन परिसरात दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prithviraj Chavan – Maharashtra Assembly Elections | नाना पटोलेंच्या अनुपस्थितीत पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा; म्हणाले – “आगामी विधानसभा निवडणूका…”

Dapodi Pune Crime News | पिंपरी : अतिक्रमण कारवाईला विरोध करुन महिला सुरक्षा रक्षकांचा विनयभंग

Manoj Jarange Patil-Maratha Reservation Andolan | मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटींचा आकडा, जरांगे म्हणाले – “नावाचा वापर करून पैसे लुटण्याचे काम…”