Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये होम थिएटरवरुन राडा, महिलेसह 5 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये होम थिएटर बाजूला सरकवल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. पाच जणांनी एकाला काचेच्या बाटलीने व खुर्चांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीतील हॉटेल स्काय येथे शनिवारी (दि.13) सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत प्रसाद रामचंद्र येळवंडे (वय-24 रा. कान्हुरकर वस्ती, निघोजे, ता. खेड) यांनी रविवारी (दि.14) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शेखर तुपे, नितीन फडके (रा. महाळुंगे) व इतर दोन अनोळखी व्यक्ती व महिलेवर आयपीसी 326, 143, 147, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद येळवंडे हे त्यांच्या मित्रासोबत निघोजे गावच्या हद्दीतील हॉटेल स्काय येथे जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी बसले असताना येळवंडे यांनी हॉटेल मधील होम थिएटर त्यांच्या बाजूला सरकवला. त्यावेळी शेजारच्या टेबलवर बसलेल्या आरोपी शेखर तुपे व इतर दोघांनी होम थिएटर सरकावल्याच्या रागातून फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. त्यावेळी येळवंडे यांनी शिवीगाळ करुन नको असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या मारल्या.

तसेच हॉटेलमधील खुर्चांनी पाठीवर व हातावर, डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
तर आरोपी महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | तृतीयपंथी कडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण, तिघांवर FIR; वाघोली येथील घटना