Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : लाईट का घालवली म्हणत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वीज वाहिनीचे काम करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना लाईट का घालवली अशी विचारणा करुन तिघांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिन जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.10) दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान जुनी सांगवी येथील कुंभारवाडा (Kumbhar Wada Sangvi) येथे घडला आहे.

याबाबत महावितरणचे कर्मचारी रत्नदीप मनोहरराव काळे (वय-39 रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव गवारे, त्याचे वडील व मित्रावर आयपीसी 353, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन वैभव गवारे याला अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या हाताखालील स्टाफ हा जुनी सांगवी येथील कुभारवाडा येथे वीज वाहिनीचे काम करण्यासाठी गेले होते.
वीज वाहिनीचे काम करण्यासाठी परिसरातील लाईट घालवण्यात आली होती.
आरोपींनी फिर्यादी यांच्या हाताखालील कर्मचारी अमोल गायकवाड, प्रसाद गायकवाड, बद्रीनाथ जाधव यांना लाईट
का घालवली अशी विचारणा केली. आरोपींनी कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
तर आरोपी वैभव याने अमोल व प्रसाद गायकवाड यांना हाताने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol In Nitin Gadkari Sabha Pune | मुरलीधर मोहोळ यांनी दिली पुणेकरांना गॅरंटी, म्हणाले – ‘पुण्याच्या व्हिजन मॅपसाठी काम करेन’