Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कामगारानेच लंपास केली पेट्रोल पंपावरील रोकड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारानेच जमा झालेली रक्कम लंपास केल्याची घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पेट्रोल पंपावरील कामगारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.29) रात्री दहाच्या सुमारास आकुर्डी येथील मोरया पेट्रोल पंपावर (Morya Petrol Pump Akurdi) घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अमेय शिरीश मालपाठक (वय-38 रा. प्लॉट नं. 45, पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दिगंबर बापू भागडे (वय-30 मुळ रा. भैरवनाथ मंदिराचे मागे, काष्टी, जि. अहमदनगर) याच्यावर आयपीसी 381 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमेय मालपाठक यांचा आकुर्डी येथील संभाजी चौकात मोरया पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर आरोपी दिगंबर भागडे हा कामाला आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पेट्रोल पंपावरील युनिट 13 वर जमा झालेली 83 हजार 500 रुपयांची रक्कम घेऊन पसार झाला. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिगंबर भागडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे स्थानबद्ध कारवाईचे शतक, आयुक्तांची एका वर्षात ऐतिहासिक कामगिरी

डेटिंग ॲपवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीला 27 लाखांचा गंडा

पुणे : जागा विक्रीच्या बहाण्याने महिलेची 1 कोटीची फसवणूक, वकिलासह चार जणांवर FIR; दोघांना अटक

दोन कंपन्यांनी एकाच वितरकाला घातला गंडा ! हाय स्पीड मोटार लावून लो स्पीड ई दुचाकी असल्याचे सांगून केली फसवणूक

Shiv Sena Shinde Group | मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, ”छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा”