Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, येऊन पाहतात तर घर भुईसपाट; 5 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जागेच्या वादातून बांधलेल्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन घर जेसीबीच्या सहाय्याने पाडून घरातील सामान चोरून नेल्याची घटना मावळ तालुक्यातील धामणे गावात (Dhamane Maval) घडली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला असून याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

अक्षय आनंद केदारी (वय 30, रा. पिंपरीगाव) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर जिजाबा गायकवाड, सोनू जिजाबा गायकवाड (दोघे रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) आणि जेसीबी व डंपर चालक यांच्या विरोधात आयपीसी 447, 448, 452, 379, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची धामणे गावात गट नं. 64 मध्ये जमीन आहे. या जागेवर फिर्यादी यांनी घर बांधले असून घराला त्यांनी कुलूप लावले होते. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. घरातील सामान बाहेर टाकले. फिर्यादी अक्षय यांनी आरोपींना याबाबत जाब विचारला असता ‘ही जागा आमची आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. आम्ही घर पाडणार’ असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली.

याबाबत अक्षय केदारी हे शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तक्रार देऊन घरी परतले असता आरोपींनी त्यांचे घर जेसीबी व डंपरच्या साह्याने पाडून घरातील सर्व सामान, घराचे पत्रे, लोखंडी खिडक्यांचे अँगल, सागवानी तुळई चोरून नेल्याचे निदर्शनास आले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dattatray Bharne | आमदार दत्तात्रय भरणे यांना सायबर चोरट्यांनी बनवलं ‘मामा’, अपघाताची बतावणी करुन घातला गंडा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक, 8 चारचाकी व 9 दुचाकी जप्त (Video)