Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : किरकोळ कारणावरुन दोन गटात राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वादाच्या कारणातून पाच सराईत गुन्हेगारांनी घरावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तर टोळक्याने एकाला शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील पर्वती परिसरात घडली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन जणांना अटक केली आहे. हा प्रकार पर्वती दर्शन येथील चाळ नं. 100 येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सीता नितीन शेंडगे (वय-33 रा. पर्वती दर्शन, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शुभम गेजगे, श्री देवेंद्र, अजय चव्हाण, सोन्या गेजगे, शुभम आडागळे व इतर दोघांवर आयपीसी 307, 427, 143, 144, 147, 148, 149, 504, 506, सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी आणि अथर्व शेंडगे यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरुन फिर्यादी यांचे पती व पुतण्या अथर्व यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी सोमवारी (दि.29) रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी कोयते, पालघन व मोकळ्या बिअरच्या बाटल्या हातात घेऊन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन कोयता मारला. मात्र कोयता दरवाजावर लागल्याने फिर्यादी थोडक्यात वाचल्या. तसेच अथर्व याच्या घराच्या दरवाजावर कोयता, पालघन मारुन घराजवळील दुचाकी, रिक्षा, टेम्पोवर कोयते मारुन वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.

पर्वती दर्शन येथे राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार अर्थव प्रदिप शेंडगे
(वय-19 रा. म्हसोबा मंदिरजवळ, पर्वती दर्शन), नितेश अशोक चंदनशिवे (रा. पानमळा, दांडेकर पुल),
राजरतन सिनिल गायकवाड (वय-24) यांना अटक केली आहे. तर कृष्णा देवेंद्र, आफन शेख यांच्यावर 324, 341 504, 143,
147, 148, 149 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलाचे आणि आरोपी अथर्व शेंडगे यांचे दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते.
याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी रस्त्याने जात असताना आडवले.
माझ्याकडे का बघतो असे म्हणत आरोपींनी फिर्यादी याचा मित्र श्री देवेंद्र याला शिवीगाळ करुन लाथाबुकक्यांनी
मारहाण केली. तर अथर्व याने हातातील बांबूने फिर्यादी याला मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणेः पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्याकडून चार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

FIR On MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण

Pune Police News | सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

Chhagan Bhujbal On CM Eknath Shinde | भुजबळांचा थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरच जोरदार हल्ला, ”कोणतेच काम पूर्ण नाही, मग कुठली शपथ पूर्ण केलीत?”