Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, नराधम बापाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वतःच्याच अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) करणाऱ्या आरोपी वडिलांवर विमानतळ पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार लोहगाव परिसरात 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 31 वर्षीय आईने रविवारी (दि.14) विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 41 वर्षीय नराधम बापावर आयपीसी 498अ, 354, 323, 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला ऑक्टोबर महिन्यात लोहगाव येथे त्यांच्या मुलांसोबत राहत होत्या. त्यावेळी त्यांच्या पतीने फिर्यादी यांच्या आईकडून बांधकामासाठी एक लाख रुपये घेतले. यानंतर पतीने फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी महिलेने पतीला सोबत राहण्यास सांगितले असता त्याने वारंवार भांडण करुन शिवीगाळ केली. तसेच महिलेला हाताने मारहाण केली. आरोपीने महिलेला ‘तुझी मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत, तु पुण्यामध्ये कशी राहते ते मी बघतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : उधार देत नाही म्हणून दुकानाची तोडफोड, हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक

Chalisgaon Crime News | मुंबई पोलीस दलातील कर्मचार्‍याचा निर्घुण खून; क्रिकेटच्या वादातून घडला प्रकार