Pune Pimpri Chinchwad Crime News | तळेगाव दाभाडे : सुट्या पैशांवरून वाहकासोबत हुज्जत घालणाऱ्या महिलेसह तिघांवर FIR

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पीएमटी बसमध्ये (Pune PMT Bus) सुट्ट्या पैशावरून वाद झाल्याने बस चालक व वाहका विरोधात महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता परस्पर विरोधी तक्रार महिला व तिच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 जानेवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील परांजपे शाळेजवळ घडली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीएमटी बसचे चालक नवनाथ व्यंकटराव ढगे (वय-28 रा. मोई गाव ता. खेड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.31 जानेवारी) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन एका महिलेसह दोन पुरुषांवर आयपीसी 324, 323, 186, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमटी मध्ये चालक म्हणून काम करतात. 28 जानेवारी रोजी महिला बसच्या पुढील दरवाजातून बसमध्ये आल्या. महिलेने वाहक मुजा लुट्टे यांच्यासोबत सुट्ट्या पैशांवरुन वाद घातला. महिलेने आरेरावी करुन तुम्हाला तुमची लायकी दाखवते असे म्हणत शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

यावेळी भांडणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करीत होते. याचा राग आल्याने महिला अंगावर धावून येत हाताने
मारहाण करुन हाताचा चावा घेतल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
तसेच बस पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना निलया सोसायटी जवळ आल्यानंतर आरोपी गाडी थांबवली.
आरोपींनी गाडीत येऊन दोघांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलासे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला

पिंपरी : दहा कोटींचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून बिल्डरची 36 लाखांची फसवणूक