Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जमिनीच्या वादातून एकाला लोखंडी रॉडने मारहाण, पाच जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | जुन्या जमिनीच्या वादातून पाच जणांनी एका व्यक्तीला लोखडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार खेड तालुक्यातील मरकळ येथे सोमवारी (दि.25) सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police Station) पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत संतोष शिवराम लोखंडे (वय-50 रा. मरकळ गावठाण, ता. खेड, पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन उमेश नारायण लोखंडे, महेश नारायण लोखंडे, किरण दिनकर लोखंडे, योगिराज उत्तम लोखंडे, प्रशांत उत्तम लोखंडे (सर्व रा. मरकळ) यांच्यावर आयपीसी 326, 324, 323, 504, 143, 147, 148, 149 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सकाळी दहा वाजता गायीला चारा टाकण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी जमिनीच्या जुन्या वादातून फिर्यादी यांच्या कपाळावर लोखंडी रॉड मारला. फिर्यादी खाली पडले असता आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ आनंदा लोखंडे याला लाकडी दांडक्याने पाठीत मारुन कपडे फाडल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल करीत आहेत.

घरगुती भांडणातून पत्नीवर चाकूने वार

चिंचवड : घरगुती भांडणातून पतीने पत्नीच्या पोटावर भाजी कापण्याच्या चाकुने वार करुन जखमी केले.
ही घटना सोमवारी (दि.25) चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे घडली. याप्रकरणी आरोपी सुमेश बुलुच राम (वय-35)
याच्यावर आयपीसी 307, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cheating Fraud Case | पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची 57 लाखांची फसवणूक

Pune Lonavala Ragging Case | पुणे : रूममेट मुलींकडून दिव्यांग मुलीची रॅगिंग, त्रास सहन न झाल्याने ‘ब्रेन स्ट्रोक’; लोणावळ्यातील धक्कादायक घटना

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष ‘वंचित’साठी दोन-दोन जागा सोडणार?