Pune Pimpri Crime | शाळेतून घरी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, निगडीतील भेळ चौकातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | शाळेतून घरी जाणाऱ्या दोन 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलींचा (Minor Girls) विनयभंग (Molestation) केल्याची घटना निगडी प्राधिकरणातील भेळ चौकात घडली आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) 27 वर्षाच्या तरुणावर आयपीसी 354 (अ) (ड), 506 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते मंगळवार (दि.6) दरम्यान घडला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी कुणाल विनायक गवारे Kunal Vinayak Gaware (वय-27 रा. शुभम डेअरीमागे, निगडी प्राधिकारण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 15 वर्षाची मुलगी आणि तिची मैत्रीण प्राधिकरणातील भेळ चौकातील शाळेत शिकतात. आरोपीने त्यांचा वारंवार पाठलाग करत होता. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोघीजणी भेळ चौकातून घरी जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला ‘गाडीवर बस नाही तर तुझ्या अंगावर गाडी घालीन’ अशी धमकी दिली. तसेच त्यांना आवाज देऊन गाडीवर बसण्याचा इशारा करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे (PSI Uttam Omase) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Two minor girls who were going home from school were molested, an incident at Bhel Chowk in Nigdi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics | सुप्रीम कोर्टात नेमंक काय झालं? ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवा ! शिंदे गटाची मोठी मागणी

SBI Clerk Recruitment 2022 | एसबीआय क्लार्क भरतीसाठी अर्ज आजपासून सुरू, पदवीधरांसाठी 5008 सरकारी नोकर्‍या

Gold Silver Rate | सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरला, चांदी सुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या 1 तोळा सोन्याचा नवीन दर

Maharashtra Politics | राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली, निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला दिले महत्त्वाचे आदेश