Pune PMC News | सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे बिले सादर करण्यासाठी ठेकेदारांचा रात्री महापालिकेत मुक्काम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) आर्थिक वर्ष रविवार ३१ मार्चला संपत आहे. परंतू शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार आणि रविवार साप्ताहित सुट्टया असल्याने आज महापालिकेमध्ये कामांच्या बिलांसाठी ठेकेदारांनी (PMC Contractor) गर्दी केली होती. परंतू सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी आणि स्लो इंटरनेटमुळे आलेल्या अडचणींमुळे ठेकेदारांसह कर्मचार्‍यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.(Pune PMC News)

महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत आहे. अशातच आज गुरूवारी शेवटचा वर्कींग डे असल्याने मागील काही महिन्यांत महापालिकेची विविध कामे केलेले ठेकेदारांनी बिले सादर करण्यासाठी महापालिकेत गर्दी केली होती. परंतू दिवसभरामध्ये साधारण पाच ते सहा वेळा वीजेचे ये जा सुरू होते. यामुळे इंटरनेट कनेक्शनमध्ये अडचणी येत होत्या. यंदा प्रथमच महापालिकेने तयार केलेल्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये बिले सादर करायची असल्याने इंटरनेटमधील अडचणींमुळे व्यत्यय येत होता. तसेच सॉफ्टवेअरमध्येही काहीना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. अशातच संध्याकाळी उशिरापर्यंत महापालिकेने कुठलिच मुदतवाढ न दिल्याने अनेकांना रात्री उशिरापर्यंत बिले सादर करण्यासाठी थांबून राहावे लागले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | पुणे: लाच घेताना ग्रामसेवक पुणे अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune CP Amitesh Kumar | ‘रस्त्यावर महिलांची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळणार’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Video)