Pune PMC News | कात्रज डेअरी लगतच्या मैदानाचे आरक्षण उठविण्याच्या प्रस्तावावर महापालिकेने नागरिकांनी हरकती व सूचना मागविल्या

आरक्षण उठविण्यास वाढता विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | कात्रज डेअरी (Katraj Dairy) येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण (Play Ground Reservation) बदलण्याबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आज जाहीर प्रकटन दिले आहे. पुढील महिनाभरामध्ये नागरिकांना महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाकडे लेखी स्वरूपात हरकती व सूचना मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. हे आरक्षण हटविण्याबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर स्थानीक नागरिकांसोबतच राजकिय पक्षांकडूनही हे आरक्षण हटविण्यास विरोध करण्यात येउ लागला आहे. (Pune PMC News)

शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष परेश खांडके यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देउन कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठविण्यास विरोध दर्शविला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. कात्रज परिसरातील बालाजीनगर, धनकवडीचा अनियोजीत विकास झाला आहे. पलिकडील जवळपास सर्व रहिवासी भाग झालेली गावे देखिल महापालिकेमध्ये आली आहेत. त्यामुळे मैदाने, उद्याने यासारख्या नागरी सुविधां नाहीत. स्पर्धा परिक्षांसाठीच्या मैदानी सरावांसाठी या भागातील युवकांना सारसबागेजवळील सणस ग्राउंडला यावे लागते. कात्रज डेअरी लगतच्या जागेमध्ये मैदान झाल्यास या युवकांसह भावी पिढीलाही उपयोग होणार आहे. त्यामुळे येथील आरक्षण उठवू नये. (Pune PMC News)

आरक्षण बदलण्यास कॉंग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे.
या निर्णयाच्याविरोधात न्यायालयात दाद मागू असा इशारा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे.
दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागाशी संबंधित आहे.
शहरी भागाच्या विकास आराखड्याच्या आरक्षण सुचिमध्ये दूध डेअरी व प्रक्रिया उ्द्योगाचा समावेश नाही.
असे असताना खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठवून त्या ठिकाणी दूध डेअरी व प्रक्रिया उद्द्योगाचे आरक्षण टाकणे हे
अयोग्य असून असा घातक पायंडा शासनाने पाडू नये असे शिंदे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

दक्षिण पुण्यातील धनकवडी बाजाजीनगर, कात्रज परिसर दाट लोकवस्तीचा आहे.
त्या तुलनेत या भागात खेळाची मैदाने कमी आहेत.
अशातच मैदानासाठीची आरक्षित जागा दूध डेअरी व प्रक्रिया उद्योगासाठी दिल्यास पुढील पिढ्यांना खेळण्यासाठी
जागाच उपलब्ध राहाणार नाही असे ही त्यांनी नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder | गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ”टोळीयुद्ध होणार नाही, शासन बंदोबस्त करेल” (Video)