Pune PMC News | पीपीपी तत्वावर क्रेडिट नोटच्या बदल्यात महामंदवाडी आणि मुंढव्यातील रस्ते विकसित होणार; पुणे महापालिकेने 170 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) मागील दोन वर्षात पीपीपी Public-Private Partnership (PPP) तत्वावर क्रेडिट नोटच्या (PPP Credit Note) बदल्यात रस्ते तयार करण्याचा धडाका लावला आहे. नुकतेच पुन्हा मुंढवा (Mundhwa) येथील एक आणि महंमद वाडी (Mohammed Wadi) येथील तीन अशा चार डीपी रस्त्यांच्या (Pune PMC DP Road) सुमारे 170 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. (Pune PMC News)

शहराचा विस्तार होत असताना रस्त्यांची संख्या अपुरी पडत आहे. महापालिकेच्या भौगोलिक विस्तार अधिक असला तरी त्यातुलनेत उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने क्रेडिट नोट च्या बदल्यात काही विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये नदीकाठ सुधार प्रकल्पासह मुंढवा – खराडी नदीवरील पूल, गंगाधाम चौकातील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर तसेच मुंढवा, बाणेर (Baner), बालेवाडी (Balewadi) आणि महंमदवाडी परिसरातील रस्त्यांचा समावेश. ही सर्व कामे सुमारे 5 हजार कोटींहून अधिक रुपयांची असून यापैकी नदी काठ सुधार योजनेतील 11 पॅकेज पैकी केवळ 2 पॅकेजच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. (Pune PMC News)

पूल आणि रस्ते विकासाच्या बदल्यात विकसकाला रोखीच्या ऐवजी क्रेडिट नोट देण्यात येणार. या क्रेडिट नोटच्या बदल्यात महापालिकेची देणी अर्थात विकास शुल्क, मिळकत कर, जाहिरात फलक शुल्क यातून भरता येणार आहेत. याचाच दुसरा अर्थ महापालिकेला येणारे पैसे विकसकाकडून वळते करून घेतले जाणार आहेत.

पालिकेने आज काढलेल्या निविदांमध्ये मुंढवा रेल्वे परिसरातील स.न.64 ते 68, 71 मधून जाणारा 12 मी. रस्ता
( 53.90 कोटी), महंमदवाडी स. न. 1,2,3,4, 96,59,58,57 मधून जाणारा 24 मी. रस्ता ( 39.03 कोटी), महामंदवाडी त3 रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटपर्यंत स.न.40 ते 76 मधून जाणारा 30 मी. व लगतचे 18 मी. रस्ते ( 64.12 कोटी) आणि येथीलच स.न. 12,13,30,32 व 57 मधून जाणारा 18 व 24 मी. रुंदीचा रस्ता ( 14.60 कोटी) याचा समावेश आहे.

Pune PMC News

मार्केटयार्ड (Pune Markentyard) येथील गंगाधाम चौकातील उड्डाणपूल (Gangadham Chowk Flyover) आणि
भुयारी मार्गाच्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या कामाची निविदा मान्य करून सुमारे दोन वर्षे होत आली आहेत.
या परिसरात मोठया प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. काही मान्यवरांनी येथून जाणाऱ्या एचसीएमटीआर
रस्त्याची अलाईनमेंट देखील बदलून घेतली आहे. मात्र उड्डाणपूल मार्केटयार्ड येथून गोकुळनगर च्या दिशेने करायचा
की बिबवेवाडी – कोंढवा रोडवर (Bibvewadi Kondhwa Road) करायचा यावरून लोकप्रतिनिधींमध्ये वाद आहेत.
त्यामुळे या पुलाचे काम रखडले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

9 October Rashifal : शुभयोगात मेष, वृषभ सह या 5 राशींना होईल लाभ, वाचा दैनिक भविष्य