Pune PMPML News | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार !

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या आंदोलनाला मोठे यश

पुणे : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व परिविक्षाधीन सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह तत्काळ कायम करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आज स्वारगेट येथील पीएमपीएमएल च्या मुख्य कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते यावेळी आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत कायम करण्यात येईल असे लेखी पत्र शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना दिले

दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तीव्र आंदोलनानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांनी परिवहन महामंडळकडील सर्व बदली कर्मचारी यांना शेड्युल मान्य कायम जागेवर नियुक्त करण्याच्या अनुषंगाने महामंडळातील प्रचलित कार्यप्रणाली धोरण कार्यवाहीला अनुसरून 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या PMPML बदली कर्मचाऱ्यांचे हजेरी रेकॉर्ड मागून त्याबाबत पंधरा जानेवारीलाच परिपत्रक निर्गमित करण्यात आले तसेच या हजेरी डिफॉल्ट किंवा रेकॉर्ड बाबतची छाननी व तपासणी करून 15 फेब्रुवारी पर्यंत बदली कर्मचाऱ्यांची माहिती मागून पात्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर शिवसेनेच्या वतीने पुकारलेले तीव्र आंदोलन स्थगित करण्यात आले

आता पुणे परिवहन महामंडळातील कामगारांच्या कायम तत्त्वावर रुजू होण्याबाबतचा प्रश्न कायमचा मिटला आहे यावेळी पीएमपीएमएल. चे कर्मचारी उमेश पांढरे, नरेंद्र आवारे,हरीश माने,नरेश चव्हाण,निवास माने,संतोष बोंडे, हरीश ओव्हाळ, शोयेब पठाण, रुपाली धावरे,सुरेखा भालेराव,सुनील नलावडे, दिलीप मोहिते, बारिश जाधव,विलास जाधव, अंकुश अडगळे,विकास वारे,अनिरुद्ध साळुंखे,असीम शेख,माधवी लांडगे,शीतल काळे, व पीएमपीएमएल चे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | तृतीयपंथी कडून पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, कोरेगाव पार्क परिसरातील घटना

कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण, तिघांवर FIR; वाघोली येथील घटना