Pune Police Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी जिल्हयातून तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Police Crime News | विमाननगर, कलवड वस्ती (Kalwad Wasti), संजय पार्क (Sanjay Park) परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणार्‍या सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्हयातून 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. राहुल भीमराव त्रिभुवन Rahul Bhimrao Tribhuvan (22, रा. संजयपार्क झोपडपट्टी, न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर, पुणे – New Airport Road Pune) असे त्याचे नाव आहे. (Pune Police Crime News)

राहुल त्रिभुवन हा विमाननगर, कलवड वस्ती, संजय पार्क भागात दहशत निर्माण करून लोकांना त्रास देत होता.
त्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होत होते.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे (Sr PI Vilas Sonde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी (PI Sangeeta Mali) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शांतमल कोळ्ळुरे (Shantamal Kollure), पोलिस हवालदार उमेश धेंडे, महिला पोलिस अंमलदार स्वाती चौधरी यांनी राहूल त्रिभुवन याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांना पाठविला होता.

प्रस्तावाची छाननी करून पोलिस आयुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी प्रस्ताव मंजुर
करून राहुल त्रिभुवन याला पुणे जिल्हयातून 2 वर्षाकरिता तडीपार केले आहे.
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Police Crime News | Vimannagar Police Station – Criminal Banned from District for 2 Years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर

Police Inspector Death In Accident On Samruddhi Mahamarg | समृध्दी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला धडकल्याने पोलिस वाहन चक्काचूर, महिला पोलिस निरीक्षकाचा मृत्यू तर 3 कर्मचार्‍यांसह आरोपी गंभीर जखमी

Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला 15 वर्षे सक्तमुजरी

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

Pune Police Crime News | पुणे पोलिस क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – अजय विटकरसह 29 जणांवर MCOCA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 23 वी ‘मोक्का’ कारवाई