Pune Police MCOCA Action | कामगारांचे अपहरण करुन लुटणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 87 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Police MPDA Action | MPDA's action against stubborn criminals in Lonikand area! 34th posting action by Police Commissioner Ritesh Kumar

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | कसबा पेठेतील साततोटी चौकात भुयारी मेट्रो स्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने रिक्षात बसवून अपहरण करुन पैसे लुटणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 87 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

कसबा पेठेतील साततोटी चौकात भुयारी मेट्रो स्थानकाचे काम करणाऱ्या कामगार पवळे चौक येथून पायी चालत जात असताना अचानक दोन अनोळखी इसमांनी फिर्यादिस धक्का दिला. चप्पल तोडल्याचा बहाणा करून धमकावून भरपाई मागीतली. फिर्यादी भरपाई देण्यास तयार होत नसल्याने त्याला जबरदस्तीने रिक्षात घालून शिवजीनगरच्या दिशेने घेऊन गेले. त्याठिकाणी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या ताब्यातून मोबाईल घेऊन मोबाईल मधील फोन पे स्कॅनर द्वारे 20 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात आयपीसी 364 (अ), 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police MCOCA Action)

दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख अंकुश सुर्यकांत थोरात (वय-29 रा. ताडीवाला रोड, मुळ रा. मुकुंदवाडी, आंबिकानगर, औरंगाबाद), मिथुन शिवदास कांबळे (वय-30 रा. ताडीवाला रोड, पुणे) यांना अटक केली आहे. आरोपी अंकुश थोरात याने प्रत्येक गुन्हे वेगवेगळ्या साथीदारांसह केले आहेत. आरोपींचे पुणे शहर, पिंपरी व औरंगाबाद शहरात गुन्हेगारी कार्यक्षत्र असून त्यांनी या ठिकाणी दहशत निर्माण केली आहे. टोळी प्रमुख अंकुश थोरात याच्याविरुद्ध जबरी चोरी, अपहरण करुन खंडणी मागणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी परिमंडळ- 1 पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, परिमंडळ- 1 पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल,
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप,
पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड,
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तपास पथकाचे पोलीस अंमलदार तुषार खडके, अजित शिंदे, पंकज देशमुख, शशिकांत ननावरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | तरुणीवर हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 60 वी स्थानबध्दतेची कारवाई

Total
0
Shares
Related Posts